बालिकावधूने बनवला रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 13:50 IST2016-05-31T08:20:33+5:302016-05-31T13:50:33+5:30
बालविवाहावर प्रकाशझोत टाकणाऱ्या बालिकावधू या मालिकेला प्रेक्षकांचा सुरुवातीपासूच खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेतील आनंदी, जग्या, दादीसा या ...

बालिकावधूने बनवला रेकॉर्ड
ब लविवाहावर प्रकाशझोत टाकणाऱ्या बालिकावधू या मालिकेला प्रेक्षकांचा सुरुवातीपासूच खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेतील आनंदी, जग्या, दादीसा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या मालिकेने आता लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागा बनवली आहे. या मालिकेचे नुकतेच २००० भाग पूर्ण झाले. हिंदी मालिकांमध्ये सगळ्यात जास्त दिवस सुरू असलेली मालिका म्हणून बालिकावधूची नोंद करण्यात आली आहे.