या कारणामुळे उपासना कपिल शर्मा शोमधून गायब आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 12:42 IST2016-11-14T12:42:18+5:302016-11-14T12:42:18+5:30
द कपिल शर्मा शोमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बुवा म्हणजेच उपासना सिंग प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. तिने हा कार्यक्रम सोडला ...
.jpg)
या कारणामुळे उपासना कपिल शर्मा शोमधून गायब आहे...
द कपिल शर्मा शोमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बुवा म्हणजेच उपासना सिंग प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. तिने हा कार्यक्रम सोडला का हा प्रश्न तिच्या सगळ्याच फॅन्सना पडला आहे. कॉमेडी नाइटस विथ कपिल या कार्यक्रमापासून उपासना कपिल शर्मासोबत काम करत आहे. या कार्यक्रमात तिने साकारलेली बुवा खूपच प्रसिद्ध झाली होती. कपिलने द कपिल शर्मा शो सुरू केल्यानंतर ती लगेचच या कार्यक्रमाचा भाग होऊ शकली नव्हती. कॉमेडी नाईटससोबत आणि वाहिनीसोबत असलेल्या करारामुळे कपिलने कॉमेडी नाईट हा कार्यक्रम सोडल्यानंतरही या कार्यक्रमाचे काही भाग तिला करावे लागले. पण नंतर ती कपिल आणि तिच्या टीमसोबत द कपिल शर्मा शोमध्ये झळकली. या कार्यक्रमातील तिची व्यक्तिरेखादेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. पण ती गेल्या दोन महिन्यांपासून कार्यक्रमातून गायब आहे. या कार्यक्रमात तिच्या पतीची भूमिका साकारणारा नसीम विकी हा पाकिस्तानी अभिनेता आहे. पाकिस्तानी अभिनेत्यांना भारतात काम करण्याची बंदी असल्याने नसीम त्याच्या मायदेशी परतला आहे. नसीम नसल्याने उपासनाची कार्यक्रमात एंट्री कशी दाखवायची हा प्रश्न वाहिनीला पडलेला असल्याने सध्या ती कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. याविषयी उपासना सांगते, "मी कार्यक्रम सोडला असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण असे काहीही नाहीये. मी आजही कार्यक्रमाचा भाग आहे. पण या कार्यक्रमात माझ्या पतीची भूमिका साकारणारा नसीम हा पाकिस्तानी असल्याने तो कार्यक्रमात नाहीये. तो नसताना माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर कशाप्रकारे सादर करायची याचा विचार सध्या सुरू आहे. वाहिनीच्या मंडळींचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा मी प्रेक्षकांना पुन्हा कार्यक्रमात पाहायला मिळेल."