या कारणामुळे अभिनयक्षेत्राकडे वळलीः प्राची तेहलान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 17:59 IST2017-11-01T12:29:34+5:302017-11-01T17:59:34+5:30

स्टार प्लस वाहिनीवर एक्कावन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्राची तेहलान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्राचीने ...

For this reason, turned towards acting: Prachi Tehlan | या कारणामुळे अभिनयक्षेत्राकडे वळलीः प्राची तेहलान

या कारणामुळे अभिनयक्षेत्राकडे वळलीः प्राची तेहलान

टार प्लस वाहिनीवर एक्कावन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्राची तेहलान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्राचीने याआधी दिया और बाती या मालिकेत काम केले होते. प्राचीच्या या नव्या मालिकेबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...

प्राची तू एक खेळाडू असताना अभिनयक्षेत्राकडे कशी वळलीस?
मी अनेक वर्षं बास्केटबॉल, नेटबॉल खेळत आहे. मी या खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. त्यामुळे फेसबुकला माझे एक पेज असून या पेजला अनेक लोकांनी लाइक केले आहे. हे पेज दिया और बातीच्या क्रिएटिव्ह हेट श्वेता बिश्नोईने यांनी पाहिले आणि त्यांनी मला मालिकेत काम करण्याची ऑफर दिली. मी अभिनय करू शकेन की नाही याची मला सुरुवातीला खात्री नव्हती. पण माझ्या दिया और बातीच्या टीमने मला खूप समजून घेतले. त्यांच्याकडून मला खूप काही शिकण्याची संधी मिळाली.

पहिला शॉर्ट देताना तू किती टेन्शनमध्ये होतीस, हे तुला आठवते का?
माझा पहिला शॉर्ट आजही माझ्या लक्षात आहे. मी खूपच नव्हर्स होते. माझा हा शॉर्ट जयश्री अरोरा यांच्यासोबत होता. त्यांनी चक दे इंडिया या चित्रपटात शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांनी मला शॉर्टच्या आधी चित्रीकरणाचे बारकावे समजावले आणि मला चांगला शॉर्ट देण्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्यावेळी त्यांनी मला जी गोष्ट सांगितली होती. ती आजही माझ्या लक्षात आहे. त्या म्हणाल्या होत्या की, शाहरुख खानच्या कारकिर्दीतील पहिला शॉर्ट देखील माझ्यासोबतच होता आणि आज तुझा देखील पहिला शॉर्ट माझ्याच सोबतच आहे. तुझ्या भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत राहातील.

एक्कावन या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
एक्कावन या मालिकेत माझी भूमिका ही छोट्या पडद्यावरील सगळ्या नायिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. मी टॉमबॉय असल्याचे सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. इतर नायिकांप्रमाणे सजणे, दागिने घालणे या गोष्टी माझ्या व्यक्तिरेखेत नाहीत. मी लहान असतानाच माझ्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे माझे आजोबा, वडील, मामा आणि काका यांनीच माझा सांभाळ केला आहे. आजवर आई आणि मुलीच्या नात्यावर अनेक मालिका आल्या आहेत. तुम्हाला या मालिकेत मुलगी आणि वडिलांचे नाते पाहायला मिळणार आहे.

तू आज छोट्या पडद्यावरची सर्वात उंच नायिका आहेस, तुझ्या उंचीमुळे तुझी एक वेगळी ओळख आहे असे तुला वाटते का?
मी उंच असल्याने शाळेत मला खेळांमध्ये सहभागी होता आले. खेळांमध्ये फेमस झाल्यामुळेच मला अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझी उंची ही माझ्यासाठी नेहमीच खास आहे. शाळेत असताना तर माझ्या उंचीमुळे खूप धमाल व्हायची. मी आठवी-नववीत असताना शाळेतील मुलांपेक्षा देखील माझी उंची जास्त होती आणि त्यामुळे सगळ्या ग्रुप फोटोंमध्ये सगळ्यात शेवटी मीच उभी असायची. 

Also Read : ​उंचीमुळे या अभिनेत्रीच्या लग्नात येतोय अडथळा

Web Title: For this reason, turned towards acting: Prachi Tehlan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.