​या कारणामुळे थांबवावे लागले परदेस में है मेरा दिल या मालिकेचे चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 12:31 IST2017-02-01T07:01:02+5:302017-02-01T12:31:02+5:30

परदेस में है मेरा दिल या मालिकेत दृष्टी धामी प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेतील तिच्या नैना या भूमिकेचे ...

For this reason there is a need to stop in Pardes, the filming of my heart or series | ​या कारणामुळे थांबवावे लागले परदेस में है मेरा दिल या मालिकेचे चित्रीकरण

​या कारणामुळे थांबवावे लागले परदेस में है मेरा दिल या मालिकेचे चित्रीकरण

देस में है मेरा दिल या मालिकेत दृष्टी धामी प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेतील तिच्या नैना या भूमिकेचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. या मालिकेमुळे तिच्या फॅन फॉलॉविंगमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. एकता कपूर या कार्यक्रमाची निर्माती असून या कार्यक्रमाच्या प्रत्येक गोष्टीत ती स्वतः बारकाईने लक्ष देत आहे. या मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांचे चित्रीकरण परदेशातही करण्यात आले आहे. या मालिकेसाठी दृष्टी प्रचंड मेहनत घेत आहे. या मालिकेचे ती सध्या दिवस रात्र चित्रीकरण करत आहे. पण नुकतेच तिच्यामुळे काही वेळ मालिकेचे चित्रीकरण थांबवावे लागले. 
परदेस में है मेरा दिल या मालिकेत दृष्टी धामी आणि अर्जुन बिजलानी प्रेक्षकांना पुढील काही भागांमध्ये नृत्य करताना पाहायला मिळणार आहेत. याचे चित्रीकरण करत असताना नुकतीच दृष्टीला छोटीशी दुखापत झाली. या दृश्यात दृष्टीला खूपच हेव्ही ज्वेलरी घालायची होती. तिच्या कानातल्यांचे वजन तर खूपच जास्त होते. यामुळे तिच्या कानाला दुखापत झाली आणि रक्त यायला लागले. त्यामुळे चित्रीकरण काही वेळासाठी थांबवावे लागले. याविषयी दृष्टी सांगते, "माझ्या कानाला काय झाले हे मला काही क्षण कळलेच नाही. माझ्या कानातल्याचे वजन खूप जास्त असल्याने अचानक माझ्या कानातून रक्त यायला लागले. माझ्या टीमने लगेचच त्यावर औषधोपचार केले. तसेच सेटवर डॉक्टरांना बोलवण्यात आले. त्यांनी काहीही सिरियस नसल्याचे सांगितल्यावरच पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली." 
दृष्टीला दुखापत झाल्यानंतरही तिने पुन्हा चित्रीकरण केले. यातून ती किती प्रोफेशनल असल्याचे सगळ्यांना दिसून आले. 

Web Title: For this reason there is a need to stop in Pardes, the filming of my heart or series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.