म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची दया मालिकेपासून दूर, कारण वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 13:57 IST2021-03-02T13:52:26+5:302021-03-02T13:57:47+5:30
दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मॅटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती मालिकेत येईल असे बोलले जात होते.

म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची दया मालिकेपासून दूर, कारण वाचून व्हाल थक्क
छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका आणि मालिकेतल्या व्यक्तीरेखा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातील प्रत्येक पात्र विशेष आहे, मात्र रसिकांची आवडती जोडी ठरली ती जेठालाल आणि दया. या दोघांच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. त्यामुळे दोघांची एकत्र धमाल रसिकांना पाहायची जणू काही सवयच झाली. मात्र काही महिन्यांपासून रसिकांची लाडकी दया ही तारक मेहता का उल्टा चष्मामधून गायब आहे. वर्षभरापासून मालिकेतून गायब असलेली दया फेम अभिनेत्री दिशा वाकाणी कधी परतणार असा प्रश्न रसिकांना पडला आहे.
दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मॅटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती मालिकेत येईल असे बोलले जात होते. 2017 मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तरी ती मालिकेत कमबॅक करेल असं बोललं जात होतं. लवकरच मालिकेत कमबॅक करणार असे वृत्त काही दिवसांपुर्वी आले होते. पण असे झाले नाही.
आतापर्यंत दिशा प्रेग्नेंसी आणि बाळामुळे शोपासून दूर होती. तिचे रिल लाइफपासून दूर राहण्याचे कारण तिचे पती असल्याचे बोलले जात आहे. दिशाचा पती मयूरच्या हस्तक्षेपामुळे ती मालिकेत कमबॅक करु शकत नसल्याच्या चर्चा आहेत. सीए असलेल्या मयूरला दिशाने काम करू नये असं वाटत असल्याचं सांगितलं जातंय.
राखी विजान मालिकेत दया बेनच्या भूमिकेत झळकू शकते. राखी विजानने दिलेल्या मुलाखतीत तिला दया बेन ही भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अधिकृत घोषणे आधी राखीने चाहत्यांना दिलेले संकेत तर नाही ना असेच सा-यांना वाटत आहे. राखी विजानने दया बेन साकारण्याची इच्छा व्यक्त केलेली असली तरी मालिकेच्या निर्मांत्याकडून अजुनतरी कोणत्याही प्रकारेच स्पष्टीकरण आलेले नाही.