या कारणामुळे भाभीजी घर पर है फेम सौम्या टंडन तुम्हाला दिसू शकते लोकल ट्रेनमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 16:50 IST2018-05-09T11:20:39+5:302018-05-09T16:50:39+5:30
भाभीजी घर पर है ही मालिका सुरू झाल्यापासूनच ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी ...

या कारणामुळे भाभीजी घर पर है फेम सौम्या टंडन तुम्हाला दिसू शकते लोकल ट्रेनमध्ये...
भ भीजी घर पर है ही मालिका सुरू झाल्यापासूनच ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेतील विभूती, अंगूरी भाभी, अनिता या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील सौम्या टंडनला काही लोक गोरी मॅम नावाने ओळखतात, तर काही लोक तिला अनिता भाभी या नावानेही ओळखतात. सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी भाभीजी घर पर है या मालिकेमुळे मिळाली.
मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट असलेल्या सौम्याचा जन्म मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात झाला. पुढे तिचा परिवार उज्जेनला शिफ्ट झाला. तिचे शिक्षणही उज्जेनलाच झाले. पण ती कामानिमित्त मुंबईत आली आणि गेल्या कित्येक वर्षापासून मुंबईत राहात आहे. मुंबई म्हटली की, ट्रॅफिक, गर्दी हे सगळे ओघाने आलेच. भाभीजी घर पर है या मालिकेचे चित्रीकरण सध्या नायगाव येथे सुरू आहे तर सौम्या या राहायला गोरेगाव येथे आहे. गोरेगाव ते नायगाव हे अंतर खूपच जास्त आहे. त्यामुळे हे अंतर पार करायला सौम्याला अनेक तास लागतात आणि त्यातही ट्रॅफिक असल्यास खूपच जास्त वेळ प्रवासासाठी लागतो. त्यामुळे सौम्या सध्या या प्रवासाला चांगलीच कंटाळली आहे. त्यामुळे ती अनेकवेळा गोरेगाव ते नायगाव असा प्रवास ट्रेनने करत आहे. रस्त्याने प्रवास करताना ट्रॅफिकमुळे खूपच वेळ वाया जातो. ट्रेनमुळे प्रवास केल्याने तिचा बराचसा वेळ वाचत असल्याने ती ट्रेनने प्रवास करणेच पसंत करत आहे. त्यामुळे गोरेगाव ते नायगाव हा ट्रेनने प्रवास करताना तुम्हाला कधी सौम्या दिसली तर त्याचे आश्चर्य वाटायला नको...
Also Read : भाभीजी घर पर है मालिकेतील या कलाकाराला मिळते सगळ्यात जास्त मानधन