​या कारणामुळे कॉफी विथ करणचा कपिल शर्मासोबत चित्रीत करण्यात आलेला भाग दाखवण्यात येणार नाहीये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 13:09 IST2017-02-25T07:39:14+5:302017-02-25T13:09:14+5:30

कॉफी विथ करण या कार्यक्रमात दर आठवड्याला एक सेलिब्रेटी हजेरी लावत असतो आणि या सेलिब्रेटींना उलटे सुलटे प्रश्न विचारून ...

For this reason, a part of the film with Kapil Sharma, Kapil Sharma, will not be shown | ​या कारणामुळे कॉफी विथ करणचा कपिल शर्मासोबत चित्रीत करण्यात आलेला भाग दाखवण्यात येणार नाहीये

​या कारणामुळे कॉफी विथ करणचा कपिल शर्मासोबत चित्रीत करण्यात आलेला भाग दाखवण्यात येणार नाहीये

फी विथ करण या कार्यक्रमात दर आठवड्याला एक सेलिब्रेटी हजेरी लावत असतो आणि या सेलिब्रेटींना उलटे सुलटे प्रश्न विचारून करण जोहर भांबावून सोडत असतो. अनेकवेळा या सेलिब्रेटींना त्यांच्या खाजगी आयुष्याविषयीदेखील प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नांना ते सेलिब्रेटीदेखील सडेतोड उत्तर देतात.
कॉफी विथ करण या कार्यक्रमासाठी नुकतेच कपिल शर्माने चित्रीकरण केले. कपिलने या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले हे कळल्यावर त्याचे सगळे फॅन्स खूप खूश झाले आहेत. कारण या कार्यक्रमात त्यांना कपिलची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल अशी त्यांना खात्री आहे. पण कपिलच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. कॉफी विथ करणसाठी कपिलने चित्रीत केलेला भाग दाखवण्यात येणार नाहीये. हा भाग तितकासा मनोरंजक बनला नाहीये तसेच या भागाच्या चित्रीकरणादरम्यान या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहर आणि कपिल शर्मा यांच्यात काही वाद रंगल्यामुळे हा भाग न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. कार्यक्रमाचे चित्रीकरण करताना करण जोहर इतर सेलिब्रेटींची ज्याप्रमाणे टर उडवतो, त्याप्रमाणे तो कपिलची उडवायला गेला. पण त्याचा कपिलला राग आला असल्याचे म्हटले जात आहे. करणने कपिलला एक प्रश्न विचारला होता. त्यावरूनच त्यांच्यात वाद रंगला अशी चर्चा आहे. करणने विचारले होते की, तू नेहमी पहाटेच्या वेळात ट्विटरला ट्वीट करत असतो. सकाळच्या वेळात ट्वीट करण्यापेक्षा जिच्यासोबत तू वेळ घालवू शकतोस अशी एखादी प्रेयसी तुला नाही आहे का? या प्रश्नावर कपिलने उत्तर देण्यास नकार दिला. मी हे उत्तर देण्यात कर्म्फटेबल नाहीये असे त्याने करणला स्पष्ट सांगितले.
यासोबतच करण आणि कपिलमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसले असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी करण आणि कपिल एका पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करत होते. त्यावेळी कपिलने शाहरुख खानला स्टेजवर बोलावले आणि त्याला त्याच्यासोबत काही वेळासाठी सूत्रसंचालन करायला लावले आणि कपिलने करणची टर खेचली. या सगळ्या कारणांमुळेच करणने कपिलचा चित्रीत केलेला भाग कार्यक्रमातून वगळण्याचे ठरवले असल्याची चर्चा आहे. 



Web Title: For this reason, a part of the film with Kapil Sharma, Kapil Sharma, will not be shown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.