या कारणामुळे हिमेश रेशमिया,पलक मुछाल,पॉपोन आणि शान आपापल्या टीममधून निवडणार फक्त ३ स्पर्धक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 11:08 IST2017-12-07T05:38:16+5:302017-12-07T11:08:16+5:30
cnxoldfiles/a>या रंगमंचावर एकाहून एक सरस परफॉर्मन्स पहायला मिळाली आणि त्यांच्यासोबतच या स्पर्धकांना आपल्या टीममध्ये घेण्यासाठी परीक्षकांमध्ये रंगलेली चुरसही चांगलीच ...
या कारणामुळे हिमेश रेशमिया,पलक मुछाल,पॉपोन आणि शान आपापल्या टीममधून निवडणार फक्त ३ स्पर्धक
cnxo ldfiles/a>या रंगमंचावर एकाहून एक सरस परफॉर्मन्स पहायला मिळाली आणि त्यांच्यासोबतच या स्पर्धकांना आपल्या टीममध्ये घेण्यासाठी परीक्षकांमध्ये रंगलेली चुरसही चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळाले. सर्वच स्पर्धकांनी इतक्या कमी वयातही स्टेज दणाणून सोडला. कोच हिमेश रेशमिया, पलक मुछाल, पॉपोन आणि शान या चौघांनी आपापल्या टीममध्ये प्रत्येकी १५ स्पर्धक निवडले. आता चार आठवडे चाललेल्या ऑडिशन्सनंतर आता 'द व्हॉईस इंडिया किड्स' हा शो बॅटल राऊंडसाठी सज्ज झाला आहे. आता स्पर्धा अधिक तीव्र, अधिक कठीण होत जाणार आहे. कारण, आता प्रत्येक स्पर्धकाला पुढे जाण्यासाठी प्रत्येक पावलावर उत्कृष्ट कामगिरीच करावी लागणार आहे. हे युद्ध, हे बॅटल पाहण्यासाठी ट्युन इन 'द व्हॉईस इंडिया किड्स' या कार्यक्रमाला तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आलं आहे. 'ब्लाइंड ऑडिशन्स', 'द बॅटल राऊंड' आणि 'द लाइव्ह राऊंड'. आता 'ब्लाइंड ऑडिशन्स' संपल्या आहेत. त्यामुळे आता सुरू होणार आहे 'बॅटल राऊंड'. या राऊंडमध्ये प्रत्येक टीममधील कोचच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला प्रत्येक स्पर्धक त्याच टीममधील इतर स्पर्धकांना टक्कर देईल. प्रत्येक कोच आपल्या टीममधून ३ प्रतिभावान गायकांची निवड करून त्यांना मार्गदर्शन करेल. त्यानंतर हे तीनही स्पर्धक एकाच गाण्यावर परफॉर्म करतील. एकच गाणं सादर करणार्या तीन स्पर्धकांपैकी एकाच स्पर्धकाची निवड करण्याचा कठोर निर्णय कोचना घ्यायचा आहे.त्यामुळे, त्यामुळे पुढे जाताना याच टप्प्यावर ही स्पर्धा चुरशीची होणार आहे.'बॅटल राऊंड' सुरू होत आहे त्यानिमित्ताने कोच शान म्हणाला, आजवरचा अनुभव अप्रतिम होता. हे स्पर्धक या वयातही फारच उत्तम गातात.एक से बढकर एक स्पर्धक या कार्यक्रमाला लाभले आहेत. त्यामुळेच हा शो गाण्याच्या इतर रिअॅलिटी शोपेक्षा वेगळा ठरतो. तीन अतिशय बलाढ्य आणि अत्यंत प्रतिभावान स्पर्धक समोर असताना त्यातून एकाची निवड करणे, कोच म्हणून आमच्यासाठी फारच कठीण असते. अशावेळी आम्हाला गायकीतील सर्व मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. चांगल्या आवाजाला बाजूला सारणे कधीही सोपे नसते.कोच पलक मुछाल म्हणाली,या मुलांसोबत साहजिकच एक खास बंध तयार होतो. म्हणूनच,त्यांच्यापैकी कोणाला रिजेक्ट करणे आमच्यासाठीही कठीण असते. या मुलांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळाल्यास त्यातून गायकीतले एक यशस्वी करिअर घडू शकते. मला मनापासून वाटते की माझी टीम अप्रतिम आहे आणि 'द व्हॉईस इंडिया किड्स' आणि 'बॅटल राऊंड'मध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करावी यासाठी मी त्यांना शक्य तितकं चांगलं ट्रेनिंग देणार आहे.कोच पॉपोन म्हणाला,या शोचा फॉरमॅट छानच आहे. मात्र, इथून पुढे, अगदी 'ब्लाइंड ऑडिशन्स'नंतरही स्पर्धकांची निवड करणं तितकंसं सोपं नाही.अनेक चांगल्या स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ठ गायक आम्ही शोधणार आहोत. माझ्या टीममधील प्रत्येक स्पर्धकाचा मला अभिमान आहे. 'द व्हॉईस इंडिया' किड्समध्ये मुलांना बरंच काही शिकायला मिळणार आहे आणि इथले अनुभव त्यांना आयुष्यात बराच काळ उपयोगी पडतील, हे मी त्यांना अनेकदा समजावून सांगितलं आहे.कोच हिमेश रेशमिया यांच्या मते, टीममध्ये स्पर्धक निवडणं हे कठीण काम होतं आणि आता त्यांच्यातून कोणाला तरी बाहेर काढणं हे तर त्याहून कठीण आहे. पण, बॅटलमध्ये या मुलांना परफॉर्म करताना पाहण्यास मी उत्सुक आहे. माझ्या टीममधील जास्तीत जास्त स्पर्धकांना टिकवून ठेवण्याची संधी मला मिळेल, अशी आशा करतो. हा रंगमंच आता सर्वोत्कृष्ट स्पर्धकाची निवड करण्यास सज्ज झाला आहे. जसजसे 'द व्हॉईस इंडिया किड्स'चे स्पर्धक पुढे जातील त्यांचे अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारे परफॉर्मन्स प्रेक्षकांना टेलिव्हीजनसमोर खिळवून ठेवतील, यात शंकाच नाही.