वयाच्या 4२ वर्षांनंतरही ‘भाभीजी’शिल्पा शिंदे आहे अविवाहित, हा अभिनेता आहे यासाठी जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 19:18 IST2020-04-17T19:18:06+5:302020-04-17T19:18:40+5:30

दोघांनी 2008 साली लग्नाचा निर्णय घेतला होता. रोमित हा चांगला मुलगा होतो त्यामुळे हे नातं सा-यांना मान्य होतं.

For this Reason 42 years Old Actress Shilpa Shinde Not Married Yet-SRJ | वयाच्या 4२ वर्षांनंतरही ‘भाभीजी’शिल्पा शिंदे आहे अविवाहित, हा अभिनेता आहे यासाठी जबाबदार

वयाच्या 4२ वर्षांनंतरही ‘भाभीजी’शिल्पा शिंदे आहे अविवाहित, हा अभिनेता आहे यासाठी जबाबदार

'भाभीजी' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे ही जरी छोट्या पडद्यापासून काहीशी लांब असली तरीही सोशल मीडियामुळे ती चाहत्यांच्या संपर्कात असते. शिल्पाला 'भाभीजी घर पर है' मालिकेने तुफान पसंती मिळवून दिली. आज जरी शिल्पाने ही मालिका सोडली असली तरी तिला भाभीजी म्हणूनच ओळखले जाते. नेहमीच शिल्पा शिंदेच्या मोडलेल्या लग्नाच्या चर्चाही ऐकायला मिळतात. शिल्पाने वयाची चाळीशी पार केली आहे. ती ४२ वर्षाची असूनही अविवाहीत आहे.  मुळात शिल्पाही अभिनेता रोमित राजच्या प्रेमात आकंत बुडाली होती. दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते.  दोघांनी 2008 साली लग्नाचा निर्णय घेतला होता. रोमित हा चांगला मुलगा होतो त्यामुळे हे नातं सा-यांना मान्य होतं.

मात्र काही दिवसांनंतर लग्न करु नये असं शिल्पा आणि रोमित या दोघांनाही जाणवलं. त्यामुळे घटस्फोट घेण्यापेक्षा आधीच वेगळे झालेले चांगलं असा विचार करुन त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बरंच ऐकावं लागलं होतं अशी प्रतिक्रिया शिल्पानेही बिग बॉसच्या घरात दिली होती. लग्न असो किंवा कोणतीही गोष्ट दरवेळी पळ काढत असल्याचे तिने म्हटले होते. 

 

त्यामुळे लग्न, कुटुंब आणि जबाबदारीमध्ये न अडकता आज ती स्वःमर्जीने तिचे आयुष्य जगत आहे. तसेच रोमित राजनेही शिल्पाला जीवनात प्रत्येक गोष्टीपासून कायम पळ काढण्याची सवय असल्याचं विधान केले होते. या सवयीमुळे तिचे वैयक्तीक आणि व्यावसायिक नुकसान होत आहे असं तो म्हणाला होता. शिल्पा आजही अविवाहित राहण्याला फक्त आणि फक्त रोमितच जबाबदार आहे असे वारंवार स्पष्ट होते.

Web Title: For this Reason 42 years Old Actress Shilpa Shinde Not Married Yet-SRJ