'शक्ती अस्तित्व के एहसास की' ने गाठला 200 वा भागाचा टप्पा, मोठ्या उत्सहात केले सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 17:26 IST2017-03-01T11:56:27+5:302017-03-01T17:26:27+5:30
'शक्ती अस्तित्व के एहसास की' या शोने त्याच्या सर्जनशील कथेने आणि स्वतःच्या कुटुंबाच्या हातून भेदभाव होण्याला सामोरे जावे लागलेल्या ...
'शक्ती अस्तित्व के एहसास की' ने गाठला 200 वा भागाचा टप्पा, मोठ्या उत्सहात केले सेलिब्रेशन
' ;शक्ती अस्तित्व के एहसास की' या शोने त्याच्या सर्जनशील कथेने आणि स्वतःच्या कुटुंबाच्या हातून भेदभाव होण्याला सामोरे जावे लागलेल्या एका किन्नराच्या - सौम्याच्या - (रुबिना दिलैक) विश्वासार्ह निवेदनाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. जेव्हा सौम्या तिच्या किन्नर असण्याशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष करत होती तेव्हा तिच्या बाजूने या गोंधळाच्या प्रवासात तिचा पती हर्मन (विवियन) आणि तिची लहान बहीण सुरभी (रोशनी सहोता) उभे राहिले होते. भारतीय टेलिव्हिजन वरील टॉप रेटेड शोमधील एक असलेल्या शक्तीने नुकताच 200 व्या भागाचा टप्पा पार केला.आणि याचा उत्सव काही किन्नरांना एकत्र आणून साजरा करण्यात आला, त्यात त्यांना कास्टने त्यांच्या पाठिंब्यासाठी आणि दीर्घकाळ त्यांचे आशिर्वाद मिळण्यासाठी धन्यवाद दिले.सौम्या ऊर्फ रुबिना दिलैक म्हणाली, ‘‘सौम्याने मला संवेदना बदलण्याची शक्ती दिली आहे. तिचा प्रवास हा एक अभिनेत्री म्हणून मला आवडला आहे. ही एक आव्हानात्मक भूमिका होती, पण खरी वस्तुस्थिती ही आहे की शक्तीमुळे आम्ही फरक पाडण्यात जास्त यशस्वी झालो आहोत. किन्नरां सोबत आजचा दिवस साजरा केल्यामुळे हा महत्वाचा टप्पा जास्तच महत्वपूर्ण ठरत आहे. कारण ही त्यांची कथा आणि त्यांचा संघर्ष आहे, जो आम्ही प्रत्येक दिवशी टेलिव्हिजनवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांचा पाठिंबा आणि आशिर्वाद म्हणजे आमच्यासाठी संपूर्ण जगाचा पाठिंबा असल्यासारखे आहे!’’ हरमन ऊर्फ विवियन दसेना म्हणाला, ‘‘शक्ती हा एक प्रबळ शो आहे ज्यात लोकांच्या प्रतिक्रिया आणि भेदभावा द्वारे मानवी भावनांवर फक्त प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.मागील काही आठवड्यांमध्ये मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि 200व्या भागाची परिपूर्णता हे सर्व प्रेक्षकां सोबत असलेल्या सुंदर प्रवासाचे लक्षण आहे.त्यांचे प्रेम आणि पाठिंबा आम्हाला हा शो प्रत्येक दिवशी अजून चांगला बनविण्यासाठी प्रेरणा देत आहे.
’
’मागील काही आठवड्यांमध्ये, सौम्याने तिचा पती हरमनचे लग्न तिच्या बहिणीशी- सुरभीशी लावून देऊन अंतिम त्याग केला आहे. तथापि, हरमनची तिला सोडून जाण्याची इच्छा नाही. जेव्हा त्याची आई प्रीतो (काम्या पंजाबी) हरमन आणि सुरभीला हनिमून साठी मुंबईला पाठविण्याची योजना करते तेव्हा तो सौम्या सुद्धा त्यांच्या सोबत असेल याची खात्री करतो. हनिमूनच्या मार्गावर नरीमन पॉइंटच्या व्यस्त रस्त्यांपासून ते अस्का बीच सारखे निसर्गरम्य ठिकाण असो मुंबईच्या लोकप्रिय ठिकाणांना भेट देताना आगामी भागामध्ये हरमन सुरभीचा पत्नी म्हणून स्वीकार करेल की त्याचे सौम्यावरील प्रेम कायम राहील हे ठरणार आहे!