​रिअल लाइफ कपल राजेश खट्टर आणि वंदना सजनानी झळकणार मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 12:56 IST2017-02-21T07:26:15+5:302017-02-21T12:56:15+5:30

राजेश खट्टरने डॉन 2, रेस 2, सपना बाबुल का बिदाई यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. नुकताच तो बेहद ...

Real life couple Rajesh Khattar and Vandana Sajnani will be seen in the series | ​रिअल लाइफ कपल राजेश खट्टर आणि वंदना सजनानी झळकणार मालिकेत

​रिअल लाइफ कपल राजेश खट्टर आणि वंदना सजनानी झळकणार मालिकेत

जेश खट्टरने डॉन 2, रेस 2, सपना बाबुल का बिदाई यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. नुकताच तो बेहद या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने नकारात्मक भूमिका साकारली असली तरी प्रेक्षकांना त्याची भूमिका प्रचंड आवडली होती. या मालिकेत नुकतेच त्याचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले. त्यांच्या निधनामागचे रहस्य कधी उलगडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. राजेशची मालिकेतून एक्झिट झाल्यापासून प्रेक्षक त्याला चांगलेच मिस करत आहेत.
राजेशच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. तो लवकरच एका मालिकेत काम करणार असून या मालिकेच्या चित्रीकरणाला त्याने सुरुवात केली आहे. 
राजेश या नव्या मालिकेत प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार असून त्याची भूमिकादेखील खूपच वेगळी असणार आहे आणि विशेष म्हणजे त्याची खऱ्या आयुष्यातील पत्नी वंदना सजनानी या मालिकेत त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. 24 फ्रेम्स ही कंपनी या मालिकेची निर्मिती करत असून फतमागुल या तुर्कीश मालिकेवर ही मालिका आधारित असणार असल्याचे कळतेय. 
वंदना आणि राजेश गेली गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत असले तरी त्यांनी कधीच एकमेकांसोबत काम केलेले नाही. आता पहिल्यांदात ते दोघे या मालिकेत एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्या दोघांची रिअल लाइफ केमिस्ट्री प्रेक्षकांना या मालिकेत अनुभवायला मिळणार आहे. वंदना गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर होती. आता ती या मालिकेद्वारे सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 
राजेश आणि वंदना सध्या या मालिकेचे चित्रीकरण धर्मशाला येथे करत असल्याचे म्हटले जात आहे. 


Web Title: Real life couple Rajesh Khattar and Vandana Sajnani will be seen in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.