पती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 12:04 IST2018-04-24T06:34:36+5:302018-04-24T12:04:36+5:30

तसेच दोघेही आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.हा व्हिडीओ पाहून आशका आणि तिचा पती ब्रेंट दोघेही खूप फिटनेस फ्रिक असल्याचे लक्षात येते.

The reaction that the TV actress appeared on Yoga along with her husband, the video was viral, responded by fans | पती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

पती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

िनयाबरोबरच नियमितपणे व्यायाम करून आपल्या फिटनेसची काळजी घेणारी टीव्ही अभिनेत्री आशका गोराडियाचा योगा करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.यांत विशेष म्हणजे ती एकटीच योगा करत नसून नवरा ब्रेंट गोबलसोबत योगा करताना दिसतेय.तसेच दोघेही आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.हा व्हिडीओ पाहून आशका आणि तिचा पती ब्रेंट दोघेही खूप फिटनेस फ्रिक असल्याचे लक्षात येते.हा व्हिडीओ नेटीझन्सना खूप इंटरेस्टींगही वाटतोय.व्हिडीओत आशकाच्या फ्लेक्झिबल मूव्हस्  नेटीझन्सच्या खूप पसंतीस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.विविध भूमिका साकारत आशकाने रसिकांच्या मनात वेगेळे स्थान निर्माण केले आहे.आशकाने ‘कुसुम’ या मालिकेतील ‘कुमूद’,‘नागीन’मधील ‘महीश्मती’ अशा अनेक व्यक्तिरेखा साकारून घराघरात पोहोचली आहे. आपल्या भूमिकांमुळेच आशका ही छोट्या पडद्यावरचा ग्लॅमरस चेहरा बनली आहे.तसेच ती ‘नच बलिये 8’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली होती.नच बलिये शोमुळे पहिल्यांदाच ब्रेंट सा-यांसमोर आला होता.त्याची शिकण्याची वृत्ती. कुठलीही गोष्ट तो इतक्या तन्मयतेने आणि विनम्रपणे शिकतो.त्याला पाहून मला स्वत:चा अभिमान वाटतो.तो माझ्यासोबत आहे,याबद्दल मी स्वत:ला नशीबवान मानते.एखाद्या छोट्याशा बाळाला एखादी नवी गोष्ट दाखवावी, असे भाव कुठलीही गोष्ट शिकताना त्याच्या चेहयावर असतात. नवी गोष्ट आत्मसात करण्यासाठीची त्याची तळमळ मला सर्वाधिक जास्त आवडते.अशा शब्दात आशकाने ब्रेंटचे कौतुक केले होते.
 

अभिनयासह इतर गोष्टी करण्यातही ती स्वत:ला बिझी ठेवते.आशकाला एक आगळावेगळा असा छंद आहे. विमानातून प्रवास करणं हे प्रत्येकाला आवडतं.मात्र आशकाला विमानातून प्रवास करण्यासोबतच ते उडवण्याचा छंद आहे. बाईक, कार चालवण्याची आवड,छंद प्रत्येकाला असतो. मात्र आशकाला बाईक आणि कार नाही तर चक्क विमान उडवण्याची आवड आहे.त्याचे तिनं रितसर प्रशिक्षणसुद्धा घेतले आहे.आशका आणि ब्रेंटची भेट दोन वर्षापूर्वी जूनमध्ये अमेरिकेत एका कार्यक्रमा दरम्यान झाली होती.ते दोघे पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले.ब्रेंट हा एक व्यवसायिक आहे.तो मुळचा अमेरिकेचा असला तरी आशकासाठी तो भारतातच राहात आहे.

Web Title: The reaction that the TV actress appeared on Yoga along with her husband, the video was viral, responded by fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.