फुलपाखरूमध्ये वाईट प्रवृत्तींचे रावण दहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 15:49 IST2017-09-29T10:19:26+5:302017-09-29T15:49:26+5:30
मराठी संस्कृती प्रमाणे दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा सण येतो. म्हणून ...
फुलपाखरूमध्ये वाईट प्रवृत्तींचे रावण दहन
म ाठी संस्कृती प्रमाणे दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा सण येतो. म्हणून याला 'नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस' असेही म्हटले जाते. प्रभू श्रीराम याच दिवशी रावण वधाकरिता निघाले होते. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला. त्यामुळे या दिवसाला 'विजयादशमी' असे नाव मिळाले आहे. चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर होणारा विजय दाखवण्यासाठी वर्षोनुवर्षं रावण दहनाची गोष्ट सांगितली जाते. नवरात्रात फुलपाखरू मालिकेमध्ये सुद्धा नवरात्राचे सेलिब्रेशन नुकतेच प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. तसेच दांडिया आणि गरबाची धुम देखील मालिकेत दाखवण्यात आली होती. या मालिकेत आता दसऱ्याच्या विशेष भागात मानस आणि वैदेही आपल्या कॉलेजमधील सर्व मित्र मंडळींसोबत वाईट प्रवृत्तीचे दहन दसऱ्याच्या दिवशी 'रावण दहन' करून करणार आहेत.
फुलपाखरू या मालिकेतील 'रावण दहन'च्या या विशेष भागासाठी एक १५ फुटी मोठा रावण बनवण्यात आला होता. या रावणाच्या प्रत्येक शिराखाली बलात्कार, स्त्रीभूण हत्या, विनयभंग, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, व्यसनाधीनता, बाल कामगार, भ्रष्टाचार, फसवणूक, गुंडगिरी, वृद्धांचा अपमान या समाजातील वाईट प्रवृत्तींबद्दल लिहिले आहे आणि या वाईट प्रवृत्तीच्या रावणाचे दहन सगळे मिळून करणार आहे. फुलपाखरू या मालिकेतील कॉलेज मधील सर्वच मुले देशाचे सजग नागरिक म्हणून या सर्व प्रवृत्ती नष्ट करायला हातभार लावण्याची शपथ घेणार आहेत.
सध्या फुलपाखरू या मालिकेने तरुणाईच्या हृदयात घर केले असून मानस आणि वैदेही यांचे लाखोंनी चाहते आहेत. मानस म्हणजेच यशोमन आपटे आणि वैदेही म्हणजेच हृता दुर्गुळे यांची कॉलेज जीवनातील निरागस प्रेम कथा दाखवणारी 'फुलपाखरू' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील रावण दहनच्या भागाचे चित्रीकरण करताना या मालिकेतील कलाकारांनी खूप मजा-मस्ती केली. त्यांच्यासाठी या भागाचे चित्रीकरण करण्याचा अनुभव खूपच चांगला असल्याचे ते सांगतात. हा भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Also Read : फुलपाखरूचा यशोमान आपटे बनला गायक