पाहा VIDEO, रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर विकतेय पाणीपुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 12:07 IST2020-05-08T12:01:56+5:302020-05-08T12:07:30+5:30

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमाळकरदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

ratris khel chale shevanta aka apurva nemlekar selling panipuri, see video PSC | पाहा VIDEO, रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर विकतेय पाणीपुरी

पाहा VIDEO, रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर विकतेय पाणीपुरी

ठळक मुद्देया व्हिडिओत रस्त्यावर पाणीपुरी विकणाऱ्या भैय्याप्रमाणे तिने खांद्यावर रुमाल टाकला आहे आणि ती त्याच्याच अंदाजात ही पाणीपुरी विकताना दिसत आहे.

सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील घरातच आहेत. प्रत्येकजण घरात राहून आपापल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. सध्या अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. ते आपले लॉकडाऊनमधील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. एवढेच नव्हे तर लाइव्ह चॅटद्वारे आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहात आहेत. 

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमाळकरदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अपूर्वा ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक खूप चांगली कूक देखील आहे. ती काही ना काही पदार्थ बनवून त्याचे पदार्थ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिच्यासमोर आपल्याला खूप सारी पाणीपुरी दिसत आहे. ही पाणीपुरी अपूर्वाने घरीच बनवली आहे. या पाणीपुरीसोबतचा एक गंमतीदार व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. या व्हिडिओत रस्त्यावर पाणीपुरी विकणाऱ्या भैय्याप्रमाणे तिने खांद्यावर रुमाल टाकला आहे आणि ती त्याच्याच अंदाजात ही पाणीपुरी विकताना दिसत आहे. 

अपूर्वाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील खळखळून हसणार यात काहीच शंका नाही. हा व्हिडिओ अपूर्वीने पोस्ट केल्यानंतर केवळ एका दिवसांत २० हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

Web Title: ratris khel chale shevanta aka apurva nemlekar selling panipuri, see video PSC