पाहा तुमच्या लाडक्या पांडूचे म्हणजेच प्रल्हाद कुरतडकरच्या पत्नीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 13:46 IST2020-05-09T13:45:22+5:302020-05-09T13:46:29+5:30

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला पांडूची भूमिका पाहायला मिळत आहे. त्याची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला खूपच छान आहे.

Ratris khel chale pandu pralhad kudtarkar wife pictures PSC | पाहा तुमच्या लाडक्या पांडूचे म्हणजेच प्रल्हाद कुरतडकरच्या पत्नीचे फोटो

पाहा तुमच्या लाडक्या पांडूचे म्हणजेच प्रल्हाद कुरतडकरच्या पत्नीचे फोटो

ठळक मुद्देप्रल्हादचे लग्न अंजली कानडेसोबत मे २०१७ मध्ये झाले असून अंजली ही योगा प्रशिक्षक आहे. त्याच्या फेसबुक अकाऊंटला त्याच्या पत्नीचे फोटो पाहायला मिळतात.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सिझनला सध्या प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेतील अण्णा, शेवंता, दत्ता, सविता, पांडू या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तसेच सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने कोणत्याही मालिकांचे चित्रीकरण होत नाहीये. त्यामुळे जुन्या मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळत आहे. रात्रीस खेळ चाले या कार्यक्रमाचा पहिला सिझन सध्या प्रेक्षकांना झी युवा वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला पांडू मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला पांडूची भूमिका पाहायला मिळत आहे. हा पांडू खुळा असून प्रत्येक गोष्ट विसरतो आणि इसरलो... असे म्हणत त्याची कबुली देखील देतो. त्यामुळे हा भोळा पांडू प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. रात्रीस खेळ चाले या मालिकेत पांडूची भूमिका कुरतडकरने साकारली आहे.

प्रल्हाद हा खूप चांगला अभिनेता आहे हे आपल्याला रात्रीस खेळ चाले या मालिकेचे दोन्ही सिझन पाहिल्यावर लक्षात येतच आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, हा प्रल्हाद हा खूप चांगला कलाकार असण्यासोबतच त्याच्यात आणखी एक खुबी आहे.

प्रल्हाद खूप चांगले लेखन करत असून तोच या मालिकेचा लेखक आहे. त्याने या शिवाय देखील काही मालिकांचे लेखन केले आहे. प्रल्हादने कॉलेज जीवनात अनेक एकांकिकांसाठी पारितोषिकं देखील मिळवली आहेत.

प्रल्हादचे लग्न अंजली कानडेसोबत मे २०१७ मध्ये झाले असून अंजली ही योगा प्रशिक्षक आहे. त्याच्या फेसबुक अकाऊंटला त्याच्या पत्नीचे फोटो पाहायला मिळतात. त्याचसोबत त्यांच्या लग्नाच्यावेळेसचा फोटो अभिनेता सुयश टिळकने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. तसेच होम मिनिस्टर या कार्यक्रमात देखील ते दोघे झळकले होते. 

Web Title: Ratris khel chale pandu pralhad kudtarkar wife pictures PSC