रात्रीस खेळ चालेमधील माईंच्या खऱ्या आयुष्यातील अण्णांचा फोटो तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 19:27 IST2020-05-15T19:25:44+5:302020-05-15T19:27:30+5:30

रात्रीस खेळ चाले या मालिकेत माईची भूमिका अभिनेत्री शकुंतला नरे साकारत आहेत. त्यांचे पती हे खूपच स्मार्ट असून त्यांनी त्याच्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

Ratris Khel Chale Mai Aka shakuntala nare's husband pictures PSC | रात्रीस खेळ चालेमधील माईंच्या खऱ्या आयुष्यातील अण्णांचा फोटो तुम्ही पाहिला का?

रात्रीस खेळ चालेमधील माईंच्या खऱ्या आयुष्यातील अण्णांचा फोटो तुम्ही पाहिला का?

ठळक मुद्देशकुंतला नरे यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्यांच्या पतीसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सिझनला सध्या प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेतील अण्णा, शेवंता, दत्ता, सविता, पांडू, माई या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तसेच सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने कोणत्याही मालिकांचे चित्रीकरण होत नाहीये. त्यामुळे जुन्या मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळत आहे. रात्रीस खेळ चाले या कार्यक्रमाचा पहिला सिझन सध्या प्रेक्षकांना झी युवा वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला माई मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

रात्रीस खेळ चाले या मालिकेत माईची भूमिका अभिनेत्री शकुंतला नरे साकारत आहेत. या मालिकेमुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात आणि चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्यांच्या पतीसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता.

झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी आणि समरने काही दिवसांपूर्वी सगळ्यांना आपल्या जोडीदारासोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे चॅलेंज दिले होते. हेच चॅलेंज स्वीकारत शकुंतला यांनी त्यांच्या नवऱ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांनी शेअर केलेला फोटो ब्लॅक अँड व्हाईट असल्याने त्यात शकुंतला नरे यांना ओळखणे देखील कठीण जात होते. हा त्यांचा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता. त्यांच्या खऱ्या आयुष्यातील अण्णा देखील खूपच स्मार्ट दिसत असत असल्याचे त्यांच्या फॅन्सने त्यांना कमेंटद्वारे सांगितले होते. 

Web Title: Ratris Khel Chale Mai Aka shakuntala nare's husband pictures PSC