वच्छी इज बॅक! संजीवनीचा वच्छी स्टाइलमध्ये रेन डान्स; Video होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 16:29 IST2022-07-11T16:29:09+5:302022-07-11T16:29:40+5:30
Sanjeevani patil: या मालिकेत वच्छीच्या अभिनयासोबतच तिचा डान्स विशेष चर्चेला गेला. आण्णांसमोर विडंबनात्मक डान्स करुन तिने प्रेक्षकांची वाहवाह लुटली होती.

वच्छी इज बॅक! संजीवनीचा वच्छी स्टाइलमध्ये रेन डान्स; Video होतोय व्हायरल
'रात्रीस खेळ चाले' (ratris khel chale) या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. मात्र, या सगळ्या कलाकारांच्या यादीत वच्छीने प्रेक्षकांच्या मनावर पार राज्य केलं. नकारात्मक भूमिकेला विनोदी छटा देत वच्छीने तिची भूमिका चोखरित्या पार पाडली. त्यामुळे ही भूमिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे वच्छी सोशल मीडियावर सक्रीय असून सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
या मालिकेत वच्छीच्या अभिनयासोबतच तिचा डान्स विशेष चर्चेला गेला. आण्णांसमोर विडंबनात्मक डान्स करुन तिने प्रेक्षकांची वाहवाह लुटली होती. या मालिकेत अभिनेत्री संजीवनी पाटील हिने वच्छी ही भूमिका साकारली होती. संजीवनी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. यात अलिकडेच तिने तिच्या कुटुंबासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती रेन डान्स करताना दिसत आहे.
संजीवनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. यात ती कुटुंबासोबत रेसॉर्टवर गेली असून वच्छी स्टाइलमध्ये रेन डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी त्यावर भन्नाट कमेंट करत आहेत.