'रात्रीस खेळ चाले'च्या शेवंताचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ, होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 18:16 IST2023-11-29T18:15:43+5:302023-11-29T18:16:12+5:30

Krutika Tulaskar : कृतिका तुळसकर हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

'Ratris Khel Chale' fame Shewanta's boldest video so far is going viral | 'रात्रीस खेळ चाले'च्या शेवंताचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ, होतोय व्हायरल

'रात्रीस खेळ चाले'च्या शेवंताचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ, होतोय व्हायरल

रात्रीस खेळ चाले (Ratris Khel Chaale) या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेचे तीन सीझन रसिकांच्या भेटीला आले होते. या तिन्ही भागांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या मालिकेने निरोप घेऊन खूप काळ उलटला आहे. तरीदेखील या मालिकेनं आणि यातील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या तिसऱ्या भागात अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) हिने शेवंताची भूमिका साकारली होती. कृतिका सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिने सोशल मीडियावर खूप बोल्ड अंदाजातील व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कृतिका तुळसकर हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने व्हाइट रंगाचा शर्ट घातले आहे. यात ती पाण्यात वेगवेगळे पोझ देताना दिसते आहे. तिचा हा शर्ट ट्रान्सपरेंट आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, वॉटर बेबी. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत असून फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. एका युजरने लिहिले की, पाणीमध्ये आग लावली. दुसऱ्या युजरने हॉट लिहिले तर आणखी एकाने वॉव असं म्हटले.

वर्कफ्रंटबद्दल...
रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत शेवंताची भूमिका कृतिका तुळसकरने साकारली होती. या मालिकेतून ती घराघरात पोहचली. ती गेल्या १८ वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत आहे. तसेच ती अनेक नाटक आणि चित्रपटात झळकली आहे. ती कथ्थक विशारदही आहे. विशेष बाब म्हणजे ती मानसोपचारतज्ञ म्हणूनही कार्यरत आहे. शेवटची ती बॉईज ४मध्ये झळकली.

Web Title: 'Ratris Khel Chale' fame Shewanta's boldest video so far is going viral