अण्णा इले...!  ‘रात्रीस खेळ चाले 3’चा पहिला भाग पाहून प्रेक्षक म्हणाले, जबरदस्त!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:03 IST2021-03-23T15:03:35+5:302021-03-23T15:03:52+5:30

‘रात्रीस खेळ चाले 3’ पहिल्या भागात अण्णांची एन्ट्री, पुढे काय?

ratris khel chale 3 first episode and users reactions | अण्णा इले...!  ‘रात्रीस खेळ चाले 3’चा पहिला भाग पाहून प्रेक्षक म्हणाले, जबरदस्त!!

अण्णा इले...!  ‘रात्रीस खेळ चाले 3’चा पहिला भाग पाहून प्रेक्षक म्हणाले, जबरदस्त!!

ठळक मुद्दे‘रात्रीस खेळ चाले 3’च्या येणा-या भागात अण्णा नाईक यांच्यासोबतच ‘शेवंता’ देखील परत येणार असल्याचे संकेत खुद्द 'शेवंता'नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने कालच दिले होते.

अण्णा नाईक परत येणार... अशी चर्चा सुरु होती. अखेर अण्णा नाईक प्रेक्षकांच्या भेटीस आले. होय, ‘रात्रीस खेळ चाले 3’ ही मालिका काल 22 मार्चपासून सुरु झाली. काल या मालिकेचा पहिला भाग असा काही रंगला की, प्रेक्षक खूश्श झालेत.
आवडला का पहिला एपिसोड? अशी एक पोस्ट झी मराठीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आणि यावर प्रेक्षकांच्या कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला. एक नंबर, एकदम कडक, खूप भारी, खतरनाक,जबरदस्त अशा  प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्यात.

‘रात्रीस खेळ चाले 3’च्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.  अण्णा वाडा विकण्यासाठी एका व्यक्तीला बोलवतात. ती व्यक्ति येते. पण  संपूर्ण वाड्यात अण्णा सोडून   कुटुंबातील एकही सदस्य दिसत नाही. अण्णा त्या व्यक्तीला दारू पिण्याचा आग्रह करतात. दोघेही बैठक मांडतात. पोटात भरपूर दारू रिचवल्यानंतर अचानक अण्णा त्या व्यक्तीच्या हातात बंदूक देऊन निशाणा लावायला सांगतात. दारूत तर्र असलेल्या त्या व्यक्तीचा निशाणा चुकतो अन् गोळी थेट अण्णांना लागते. पण हे काय? गोळी लागूनही अण्णांना काहीच होत नाही.  अण्णा त्याच्या समोर उभे असतात.... अण्णा जिवंत नाहीत, हे तर यावरून लक्षात येते. पुढे काय होते? हे पाहायला अर्थातच या मालिकेचे येणारे एपिसोड तुम्हाला बघावे लागतील.

‘रात्रीस खेळ चाले 3’च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अण्णांच्या वाड्यात पुढे काय काय घडते? पाप, शाप आणि उ:शापचा हा प्रवास कुठपर्यंत जातो? शिवाय  शेवंताची एन्ट्री होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे होणार आहे.

शेवंता येणार...

‘रात्रीस खेळ चाले 3’च्या येणा-या भागात अण्णा नाईक यांच्यासोबतच ‘शेवंता’ देखील परत येणार असल्याचे संकेत खुद्द 'शेवंता'नं म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने कालच दिले होते.
अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली होती. थरार आणि रहस्यमय कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणाºया या मालिकेतील शेवतांचा नवा लूक तिने सोशल मीडियात शेअर केला होता. लाल रंगाची नऊवारी साडी, कपाळावर कुंकु आणि हातात हिरवा चुडा अशा रुपात उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेवंताचा लूक या मालिकेतील तिच्या भूमिकेची उत्कंठा वाढवणारा ठरतो आहे.

Web Title: ratris khel chale 3 first episode and users reactions