ही चिमुरडी आहे रात्रीस खेळ चाले २ मधील तुमची आवडती अभिनेत्री... ओळखा पाहू कोण आहे ही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 16:05 IST2019-05-31T16:02:16+5:302019-05-31T16:05:55+5:30

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे.

Ratris Khel chale 2 Shevanta aka apurva nemlekar childhood pictures | ही चिमुरडी आहे रात्रीस खेळ चाले २ मधील तुमची आवडती अभिनेत्री... ओळखा पाहू कोण आहे ही?

ही चिमुरडी आहे रात्रीस खेळ चाले २ मधील तुमची आवडती अभिनेत्री... ओळखा पाहू कोण आहे ही?

ठळक मुद्देशेवंताने म्हणजेच अपूर्वाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतात तिचा एक लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोतली चिमुकली अपूर्वा खूपच गोड दिसत असून जब में छोटी बच्ची थी असे कॅप्शन तिने फोटोसोबत दिले आहे.

रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले २ प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. 

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले आहेत. या मालिकेमुळे त्या दोघांनाही चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे. या मालिकेत नुकताच काशीचा मृत्यू झाला असून पुढे काय होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत अण्णा नाईक ही भूमिका माधव अभ्यंकर साकारत आहेत तर शेवंताच्या भूमिकेत अपूर्वा नेमळेकर दिसत आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले २ या मालिकेमुळेच मिळाली.

शेवंताची अपूर्वाची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली आहे की, तिचे फॅन्स आता मोठ्या संख्येने सोशल मीडियावर तिला फॉलो करत आहेत. तुमच्या लाडक्या शेवंताने म्हणजेच अपूर्वाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतात तिचा एक लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोतली चिमुकली अपूर्वा खूपच गोड दिसत असून जब में छोटी बच्ची थी असे कॅप्शन तिने फोटोसोबत दिले आहे. ती आताप्रमाणेच लहानपणी देखील खूपच छान दिसायची असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

अपूर्वाने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांमध्ये देखील काम केले आहे. तसेच इश्क वाला लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. 

Web Title: Ratris Khel chale 2 Shevanta aka apurva nemlekar childhood pictures