रात्रीस खेळ चाले ३,'वच्छी परत येतेय', कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 13:49 IST2021-11-18T13:36:44+5:302021-11-18T13:49:20+5:30

'रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय.

Ratris Khel Chal3 fans are eager to meet this famous character Vacchi, know who is she? | रात्रीस खेळ चाले ३,'वच्छी परत येतेय', कोण आहे 'ती'?

रात्रीस खेळ चाले ३,'वच्छी परत येतेय', कोण आहे 'ती'?

'रात्रीस खेळ चाले ३' या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय. ही मालिका प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती की, या मालिकेत कोणते कलाकार असणार आहेत. मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली पण बाकी कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यातच होती. मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर त्यातील कलाकार देखील प्रेक्षकांच्या समोर आले आणि हे चेहरे प्रेक्षकांच्या ओळखीचेच आहेत.मात्र या सगळ्यांमध्ये वच्छी मात्र गायबच होती. वच्छी दिसत नसल्याने चाहते तिलाही प्रचंड मीस करत होते. अखेर ‘ती परत आलीये’.लवकरच आगामी भागात वच्छीचे मालिकेत रसिकांना दर्शन घडणार आहे. अभिनेत्री संजीवनी पाटील लवकरच या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

'रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय. कारण दोन भागांची सांगड घालून मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहेत. नाईकांच्या वाडयातल्या शुभ कार्यापासून झालेली मालिका वाड्यात वावरणाऱ्या अण्णा शेवंतांच्या अतृप्त आत्म्या पर्यंत येऊन पाहोचली आहे. 

माईने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वाडा शेवंतांच्या ताब्यात दिला असला तरी वाड्याबद्दल असलेली तिची आपुलकी आणि मुलांवर असलेला जिव्हाळा यामुळे माईचे प्रयत्न नक्कीच थांबणार नाहीत. तिची पुण्याई तिच्यासोबत असली तरी हवी एक अशी व्यक्ती जी ह्या दुष्ट शक्तीवर अंकुश ठेवेल. कोण असेल ही व्यक्ती? असा अंदाज बांधत असाल तर ही व्यक्ती तुमच्या परिचयाची आहे. आणि हे तुमचं लाडकं पात्र आहे. 

हो ती परत येतेय.. 'वच्छी परत येतेय'.वाड्याचा जिला हव्यास होता ती वच्छी नेमकं काय करणार? खरच माईच्या पाठीशी उभी राहणार का? शोभा, काशीच्या मृत्यूचा सूड घेणार का? तुमच्या मनातल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं घेऊन 'वच्छी परत येतेय.' मालिकेतील आगामी भागात प्रेक्षकांना वच्छीच्या येण्याने एक रंजक वळण पाहायला मिळेल.  

Web Title: Ratris Khel Chal3 fans are eager to meet this famous character Vacchi, know who is she?