'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरचा वेस्टर्न लूक, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 18:08 IST2019-07-23T18:08:03+5:302019-07-23T18:08:27+5:30

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे.

Ratris Khel chaale 2 fame Apurva Nemalekar western look, see her photo | 'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरचा वेस्टर्न लूक, पहा तिचे फोटो

'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरचा वेस्टर्न लूक, पहा तिचे फोटो

'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच 'रात्रीस खेळ चाले २' प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. 

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले आहेत. या मालिकेमुळे त्या दोघांनाही चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे. या मालिकेत नुकताच काशीचा मृत्यू झाला असून पुढे काय होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.


शेवंताने नुकतेच सोशल मीडियावर वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस दिसते आहे. 

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत अण्णा नाईक ही भूमिका माधव अभ्यंकर साकारत आहेत तर शेवंताच्या भूमिकेत अपूर्वा नेमळेकर दिसत आहे.

अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले २ या मालिकेमुळेच मिळाली.

अपूर्वाने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांमध्ये देखील काम केले आहे.

तसेच इश्क वाला लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. 
 

Web Title: Ratris Khel chaale 2 fame Apurva Nemalekar western look, see her photo