अमेरिकेत जाऊन 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनाया झाली आणखीच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 20:00 IST2021-03-16T20:00:00+5:302021-03-16T20:00:06+5:30

गेल्या काही दिवसांपासून रसिका तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आहे.

Rasika sunil share her glamorous photo on internet | अमेरिकेत जाऊन 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनाया झाली आणखीच ग्लॅमरस

अमेरिकेत जाऊन 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनाया झाली आणखीच ग्लॅमरस

अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारते आहे. शनायाच्या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. रसिका सुनील सोशल मीडियावर सक्रीय असून ती आपल्या चाहत्यांना या माध्यमातून अपडेट देत असते. रसिका सध्या अमेरिकेत आहे.  इन्स्टाग्रामवर तिने आपला वनपीसमधला एक फोटो शेअर केला आहे. ज्यातील तिच्या अदा घायाळ करणार आहे. पांढऱ्या रंगाच्या वनपीसमध्ये रसिका खूपच ग्लॅमरस दिसतेय. तिचा हा फोटो चाहत्यांना आवडला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून रसिका तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आहे. रसिका आदित्य बिलागीला डेट करते आहे. काही दिवसांपूर्वी रसिकाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. रसिकाने शेअर केलेल्या फोटोत आदित्य गुडघ्यावर बसून रसिकाला प्रपोज करत असून रसिकाच्या हातात अंगठी घालत आहे. त्यासोबत तिने लिहिले आहे की, मी आयुष्यभर लक्षात ठेवेन असे सरप्राईज आदित्यने मला दिले असून त्याने मला एका वेगळ्या अंदाजात प्रपोज केले. आमची त्या दिवशी लव्ह एनिव्हर्सरी होती. त्यामुळे मी कपडे काय घालायचे हे देखील त्यानेच सांगितले होते. तसेच त्याने लॉस एंजिलिस शहराची हॅलिकॉपटर राईड घडवली. त्याने गुडघ्यावर बसून मला प्रपोज केले, खरे तर या क्षणाच्या आधीच मी त्याला होकार देण्यासाठी तयार होते.

रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता.
 

Web Title: Rasika sunil share her glamorous photo on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.