राशूल टंडन ‘साम दाम दंड भेद’ मालिकेत केशव त्रिपाठीच्या भूमिकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 12:10 IST2018-04-04T06:40:36+5:302018-04-04T12:10:36+5:30

‘स्टार भारत’वरील ‘साम दाम दंड भेद’ मालिकेत सध्या नाट्यपूर्ण घडामोडी सुरू असून सर्व जबाबदारी घेऊनही आपला भाऊ प्रभातच्या खुनाचा ...

Rashul Tandon plays Keshav Tripathi in the series 'Same-price Penalties'! | राशूल टंडन ‘साम दाम दंड भेद’ मालिकेत केशव त्रिपाठीच्या भूमिकेत!

राशूल टंडन ‘साम दाम दंड भेद’ मालिकेत केशव त्रिपाठीच्या भूमिकेत!

्टार भारत’वरील ‘साम दाम दंड भेद’ मालिकेत सध्या नाट्यपूर्ण घडामोडी सुरू असून सर्व जबाबदारी घेऊनही आपला भाऊ प्रभातच्या खुनाचा ठपका विजयवर ठेवण्यात येत आहे. अशा या अनपेक्षित वळणावर केशव त्रिपाठी या व्यक्तिरेखेद्वारे अभिनेता राशूल टंडनचा या मालिकेत प्रवेश होत आहे.राशूल टंडनने ‘पिंक’ आणि ‘हिरोपन्ती’ यासारख्या चित्रपटांत भूमिका साकारल्या असून या मालिकेत तो एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.राशूलने यापूर्वी ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘बालवीर’ या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. ‘साम दाम दंड भेद’ या मालिकेत तो आपल्या हाती एक चांगली केस यावी, याची प्रतीक्षा करणा-या वकिलाच्या भूमिकेत आहे. त्याची व्यक्तिरेखा विनोदी आहे. आपला मोठा भाऊ प्रभात याच्या खुनाच्या आरोपातून विजयला मुक्त करण्यासाठी तो बुलबुलची मदत करील.मालिकेतील आपल्या भूमिकेविषयी राशूल म्हणाला, “मी ही मालिकेत भूमिका रंगविण्याचा निर्णय घेतला, त्याचं कारण माझी आई.माझ्या आईला टीव्ही पाहण्याचं वेड असून ती ‘साम दाम दंड भेद’ ही मालिका नियमित बघते.या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरण्यासाठी मी माझ्या भावाची मदत घेतली. तो लखनौ उच्च न्यायालयात वकील आहे. त्याच्याकडून मी कोर्टातलं वातावरण कसं असतं, त्याच्यासारखे वकील कोणता विचार करीत असतात,ते कामाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात वगैरे गोष्टी समजावून घेतल्या. ‘साम दाम दंड भेद’च्या टीमबरोबर काम करण्यास मी खूप उत्सुक बनलो आहे कारण त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे.यातील कलाकार फारच गुणवान आणि समंजस आहेत. विशेषत: भानू उदय आणि ऐश्वर्या खरे यांनी माझं पहिल्याच दिवशी स्वागत केलं.”

एकत्र काम करत असताना कलाकारांमध्ये प्रेमांकुर फुलू लागतात हे तर जगजाहीर आहे.असंच काहीसं टीव्हीचे  ऑनस्क्रीन कपल वरूण तुर्की आणि सोनल वेंगुर्लेकरमध्ये घडत आहे.चोरी चोरी चुपके चुपके 'साम दाम दंड भेद'मालिकेच्या सेटवर रिअल लव्हस्टोरी फुलू लागली आहे.वरूण आणि सोनल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.विशेषतः वरूण आपल्या लेडी लव्ह सोनलला खुश ठेवण्याचा तो कायम प्रयत्न करत असतो. सोनलला सरप्राईजेस देणे हा जणू वरूणचा छंदच बनला आहे.सकाळ संध्याकाळ वरूण सोनलसाठी विविध गिफ्ट घेऊन येत असल्याचे पाहायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वी तर वरूणने आपल्या प्रेमासाठी म्हणजेच सोनलसाठी खास गिफ्टही मागवलं होतं. हे गिफ्ट पाहून सोनलच्या आनंदाला पारावार उरला नाही.त्यामुळे  सोनलसुद्धा वरूणवर लट्टू झाल्याचे बोललं जात आहे. 

Web Title: Rashul Tandon plays Keshav Tripathi in the series 'Same-price Penalties'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.