रुषीराज पवारची पेशवा बाजीरावमध्ये होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 12:22 IST2017-04-19T06:52:57+5:302017-04-19T12:22:57+5:30

रुषीराज पवारने चंद्रगुप्ता मौर्या या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच या ...

Rashiraj Pawar's entry will be done in Bajirao Peshwa | रुषीराज पवारची पेशवा बाजीरावमध्ये होणार एंट्री

रुषीराज पवारची पेशवा बाजीरावमध्ये होणार एंट्री

षीराज पवारने चंद्रगुप्ता मौर्या या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळाले होते. आता रुषीराजची एका ऐतिहासिक मालिकेत एंट्री होणार आहे. 
पेशवा बाजीराव या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार ऐतिहासिक भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारत आहेत. आता या मालिकेत एक नवी एंट्री होणार आहे. या मालिकेत मल्हारराव होळकर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ही भूमिका या मालिकेत रुषीराज साकारणार आहे. रुषीराज हा एक चांगला अभिनेता ओळखला जातो. त्यामुळे तो ही भूमिकादेखील ताकदीने पेलेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.
या मालिकेत मल्हारराव होळकर ही भूमिका साकारण्यासाठी एका चांगल्या पण ओळखीच्या चेहऱ्याच्या शोधात टीम होती. ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने ही भूमिका तितकीच प्रभावीपणे साकारणारा अभिनेताच या व्यक्तिरेखेसाठी टीमला हवा होता. त्यामुळेच या भूमिकेसाठी रुषीराजची निवड करण्यात आली आहे. रुषीराजला या भूमिकेबद्दल सांगताच त्याने क्षणाचाही विलंब न लावता या मालिकेसाठी होकार दिला. त्याने या मालिकेसाठी शुटिंगदेखील सुरू केली आहे. या मालिकेसाठी सध्या तो खूप मेहनत घेत असल्याचे कळतेय. या भूमिकेविषयी रुषीराज सांगतो, "पेशवा बाजीरावसारख्या मालिकेचा भाग असणे हा कोणत्याही कलाकारासाठी एक सन्मान आहे. मी या मालिकेत मल्हारराव होळकर ही भूमिका साकारत असल्याने खूपच खूश आहे. ही मालिका पाहिल्यानंतर माझ्या फॅन्सची प्रतिक्रिया काय असणार याची मला उत्सुकता लागली आहे." 

Web Title: Rashiraj Pawar's entry will be done in Bajirao Peshwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.