रणवीर सिंग करणार आता 'हेही' काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 17:24 IST2018-10-12T17:14:25+5:302018-10-12T17:24:21+5:30
लवकरच रणवीर सिंग करण जोहरच्या 'तख्त' सिनेमात दिसणार आहे. ‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल.

रणवीर सिंग करणार आता 'हेही' काम
बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंग आता डिश टीव्ही ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. रणवीर सिंग हा एक ख्यातनाम आणि आघाडीचा चित्रपट अभिनेता असून तो डिश टीव्हीच्या नवीन ब्रँड कॅम्पेन डिश नहीं ''ढिशकियाँ'' या अत्यंत देखण्या आणि तारूण्यपूर्ण अवतारात लोकांच्या घराघरात पोहोचेल.
डिश टीव्ही इंडिया लि.सोबत आपल्या भागीदारीबाबत बोलताना रणवीर सिंग म्हणाला की, मला डिश टीव्हीचा भाग होताना खूप आनंद झाला आहे, हा एक असा ब्रँड आहे जो मनोरंजनासाठी माझ्याइतकाच उत्सुक आहे. मी खूप उत्साहात आहे आणि लोकांनी ही जाहिरात पाहावी म्हणून उत्सुक आहे.
लवकरच रणवीर सिंग करण जोहरच्या 'तख्त' सिनेमात दिसणार आहे. ‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे प्रेम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल. करण जोहर निर्मित या चित्रपटात रणवीर सिंग, करीना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. रणवीर व विकी यात दोन भावांची भूमिका साकारतील. जान्हवी रणवीर सिंगच्या प्रेयसीची तर करीना त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असेल