'डीआयडी लिटिल मास्टर्स'च्या सेटवर बच्चे कंपनीसह राणी मुखर्जीने असे लावले ठुमके
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 15:23 IST2018-03-31T09:53:02+5:302018-03-31T15:23:02+5:30
छोट्या पडद्यावरील ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमात ब्लॉकबस्टर बच्चेकंपनी यांनी राणी मुखर्जीला एक खास सरप्राईज दिले.राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या ...
'डीआयडी लिटिल मास्टर्स'च्या सेटवर बच्चे कंपनीसह राणी मुखर्जीने असे लावले ठुमके
छ ट्या पडद्यावरील ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमात ब्लॉकबस्टर बच्चेकंपनी यांनी राणी मुखर्जीला एक खास सरप्राईज दिले.राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाला मिळालेले व्यावसायिक यश साजरे करण्यासाठी स्वत: राणी मुखर्जी या कार्यक्रमात सहभागी होणार असून त्यावेळी या कार्यक्रमातील स्पर्धक उत्कृष्ट कामगिरी करून दाखवितील.राणी मुखर्जीच्याच ‘दिल बोले हडिप्पा’ या चित्रपटातील ‘डिस्कोवाले खिसको’ या गाण्यावर राणीसह बच्चेकंपनीने ठेका धरला.‘डिस्कोवाले खिसको’ गाण्यावर नृत्ये सादर करतीलच शिवाय तिच्या ‘मर्दानी’ आणि ‘साथिया’या चित्रपटांतील ‘कभी अलविदा ना कहेना’, ‘तेरा चेहरा जब नजर आए’, ‘मैं तुमको नहीं छोडूंगी’ या लोकप्रिय गाण्यांवर बीर शेर्पा, जीतूमोनी, वैष्णवी आणि तन्मय या स्पर्धकांनी रिले नृत्य सादर करून सा-यांचे मनोरंजन केले.स्पर्धकांच्या जोशपूर्ण कामगिरीमुळे राणी मुखर्जीच नव्हे, तर चित्रांगदा सिंह, सिध्दार्थ आनंद आणि मार्झी पेस्तनजी हे परीक्षकही भारावून गेले होते.
राणी मुखर्जीने हिंदी चित्रपटांसाठी आजवर केलेल्या योगदानाबद्दल ट्रीब्युट देण्यात आले.तिच्या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी या स्पर्धकांनी धमाल नृत्ये सादर केली.मन आणि अमित या जोडीने ‘ड्रीमम् वेकपम्’ या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले, तर सत्यम रायने ‘मैं जहाँ रहूँ’ या गाण्यावर अफलातून नृत्य सादर करून सर्वांना भारावून टाकले.नेपाळचा स्पर्धक रोहन थापा- ज्याला ‘जॅकी चॅन’ असे टोपणनाव देण्यात आले आहे- याने ‘जादू’ या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने परीक्षक चांगलेच प्रभावित झाले. मूर्ती विसर्जनानंतर त्यांची होणारी विटंबना आणि शेतक-यांना ज्या अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागते, त्यावर आधारित संकल्पनेवर सूर्य श्रीजिन आणि एपी रॉकर्स यांनी अनुक्रमे सादर केलेल्या ‘भगवान है कहाँ रे तू’ आणि ‘घनन घन’ या दोन गाण्यावरील नृत्याने सर्वांच्याच डोळ्यांत पाणी तरळले. ‘आरडीए’ने सादर केलेल्या ‘रक्तचरित्र’ गीतावरील अफलातून नृत्याने या विशेष कार्यक्रमाचा समारोप झाला आणि या ब्लॉकबस्टर बच्च्यांमध्ये किती विविध प्रकारची नृत्ये सादर करण्याची क्षमता आहे, ते दिसून आले.