'रंग माझा वेगळा'मधील माय-लेकी आल्या चर्चेत, दीपा आणि कार्तिकीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 07:00 IST2021-11-25T07:00:00+5:302021-11-25T07:00:00+5:30

'रंग माझा वेगळा'मधील माय-लेकी बऱ्याचदा सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे चर्चेत येत असतात.

Rang Maza Vegla fame Deepa and Karthiki's dance video goes viral | 'रंग माझा वेगळा'मधील माय-लेकी आल्या चर्चेत, दीपा आणि कार्तिकीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

'रंग माझा वेगळा'मधील माय-लेकी आल्या चर्चेत, दीपा आणि कार्तिकीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेने प्रेक्षकांचे कमी कालावधीत मन जिंकले आहे. या मालिकेच्या वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेतील सर्वच मुख्य पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. यातील मुख्य पात्र साकारणारे कलाकार सातत्याने चर्चेत असतात. दरम्यान रंग माझा वेगळामधील माय लेकी सध्या खूप चर्चेत आला आहे. त्यांचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रंग माझा वेगळा मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे. तर तिची लेक कार्तिकीची भूमिका सायशा भोईर ही करते आहे. सायशाची ही पहिलीच मालिका आहे. मात्र पहिल्याच मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच रेश्मा आणि सायशाने सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या दोघी रिलवरील ट्रेडिंग गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.  यापूर्वीदेखील रेश्माने सायशासोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

कार्तिक-दीपा येतील का एकत्र?
रंग माझा वेगळा मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कित्येक वर्षांनंतर एकमेकांपासून दुरावलेल्या जुळ्या बहिणी कार्तिकी आणि दीपिका एकमेंकांच्या संपर्कात आल्या आहेत. त्या दोघी बहिणी आहेत, हे त्यांना माहित नाही. मात्र त्या दोघी एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रीणी आहेत. दीपाला देखील दीपिका ही तिची मुलगी आहे,हे माहित नाही. कार्तिकीचे देखील दीपिकाच्या शाळेत अॅडमिशन होते. त्यामुळे शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी दीपा आणि दीपिकाच्या घरातील सर्व जण शाळेत येतात. त्यामुळे आतातरी कार्तिक आणि दीपा पुन्हा एकत्र .येतात का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Rang Maza Vegla fame Deepa and Karthiki's dance video goes viral