लय भारी!,'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदेच्या स्माइलवर चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 07:00 IST2021-11-20T07:00:00+5:302021-11-20T07:00:00+5:30

पुन्हा एकदा रेश्मा शिंदे ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे.

Rang Maza Vegla fame Deepa aka Reshma Shinde's latest photo goes viral | लय भारी!,'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदेच्या स्माइलवर चाहते झाले फिदा

लय भारी!,'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदेच्या स्माइलवर चाहते झाले फिदा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षकांना पसंती मिळाली आहे. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदेने साकारली आहे. या मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे. रेश्मा शिंदे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा रेश्मा शिंदे ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिच्या फोटोतील स्माइलवर चाहते फिदा झाले आहेत.

अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हाइट स्पगेटी ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत रेश्मा विना मेकअप लूकमध्ये दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. या फोटोवर एका चाहत्याने लिहिले की, तुझी स्माइल बेस्ट आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले की, तुझी स्माईल किती क्युट आहे. तर आणखी एका युजरने म्हटले खूपच सुंदर स्माईल. तुझे हे हसणे मार डाला अशी कमेंट एकाने केली आहे.


रंग माझा वेगळा मालिका सध्या वेगळ्या वळणावर आली आहे. मालिकेत आयशा कार्तिकच्या लग्नासाठी मागे लागली आहे. मात्र दीपासोबत घटस्फोट झाला नसल्यामुळे ते लग्न करू शकत नाही. दीपा आणि कार्तिकची कधी भेट होईल, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Rang Maza Vegla fame Deepa aka Reshma Shinde's latest photo goes viral