Rang maza Vegala : कार्तिक दीपामधला दुरावा अखेर मिटणार? कार्तिकने गुडघ्यावर येत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 13:40 IST2022-12-18T13:38:38+5:302022-12-18T13:40:16+5:30
कार्तिक आणि दीपाने एकत्र यावं असं सतत प्रेक्षकांना वाटत होतं. आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. मालिकेत कार्तिकने दीपावर बरेच आरोप केले हे काही प्रेक्षकांना आवडलं नाही.

Rang maza Vegala : कार्तिक दीपामधला दुरावा अखेर मिटणार? कार्तिकने गुडघ्यावर येत...
Rang maza Vegala : प्रसिद्ध मालिका 'रंग माझा वेगळा' मध्ये लवकरच कार्तिक आणि दीपा यांच्यातील दुरावा संपणार आहे. कार्तिक आणि दीपाने एकत्र यावं असं सतत प्रेक्षकांना वाटत होतं. आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. मालिकेत कार्तिकने दीपावर बरेच आरोप केले हे काही नेटकऱ्यांना आवडलं नाही. कार्तिक आणि दीपा एकमेकांपासून दूरहू झाले. तेव्हापासूनच प्रेक्षक दीपा आणि कार्तिक यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते. आता मात्र कार्तिकने गुडघ्यावर येत दीपाची माफी मागितली आहे. त्यामुळे त्यांच्यातील दुरावा मिटणार असेच दिसते.
कार्तिक आणि दीपा यांच्यात अनेक गैरसमज झाले होते ते आता अखेर दूर होणार आहे. सौंदर्या आणि दीपाच्या सांगण्यावरून कार्तिकने पुन्हा एकदा फर्टीलिटी टेस्ट करून घेतली होती. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता दीपिका आणि कार्तिकी आपल्याच मुली आहेत हे कार्तिकने मान्य केलं आहे. यामुळे आता कार्तिक चक्क गुडघ्यावर येत दीपाची माफी मागणार आहे. या मुली माझ्या म्हणजेच आपल्या असल्याचं सत्य तो स्वीकारणार आहे. तसेच पुन्हा एकदा कार्तिक दीपाला आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये कार्तिक भर रस्त्यातच दीपाची माफी मागताना दिसत आहे.
कार्तिक म्हणतोय, 'मला माफ कर दीपा. इतके वर्ष मी खूप चुकीचा वागलो. तुझ्यावर नाही नाही ते आरोप केले, माझ्यासाठी तुला अग्निपरीक्षाही द्यावी लागली. एक बाप म्हणून आणि नवरा म्हणून मी खूप चुकलो. ज्या कार्तिकने सगळ्यांसमोर तुला घराबाहेर काढलं आज तोच कार्तिक सगळ्या जगासमोर तुझी हात जोडून माफी मागत आहे. मला माफ कर दीपा.'
मात्र दीपा खरंच कार्तिकला माफ करणार का हे अजुन अनुत्तरितच आहे. खरंतर दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. तसेच त्यांच्यावर दोन मुलींची जबाबदारी आहे. त्यामुळे मुलींसाठी का होईना दोघे पुन्हा एकत्र यावेत अशी आशा प्रेक्षक करत आहेत. आता पुढे काय होते हे बघणे महत्वाचे आहे.