क्या बात! राणा दा आणि अंजलीबाईंचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 20:51 IST2022-05-03T20:37:31+5:302022-05-03T20:51:41+5:30
Akshaya Deodhar And Hardik Joshi Engaged: हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

क्या बात! राणा दा आणि अंजलीबाईंचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala)ने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ लोटला आहे. या मालिकेला आणि या मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. मालिकेत राणादाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशी(Hardik Joshi)ने साकारली होती तर अंजली पाठकची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधर(Akshaya Deodhar)ने निभावली होती. आता प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे, तुमची ही लाडकी खऱ्या आयुष्यात पत्नी पत्नी होणार आहेत. हो, हे खरंय हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
अभिनेत्री अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, फायनली एंगेज. साखरपुड्यावेळी अक्षयाने पिच रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केलेला पाहायला मिळतो आहे. तिला मॅचिंग असा गेटअप हार्दिकनेही केला आहे. त्याने पिच रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचे जॅकेट घातले आहे.
या फोटोवर फक्त सेलिब्रेटीच नाही तर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्यांने कमेंटमध्ये म्हटले की, अखेर खऱ्या राणा आणि अंजलीच्या कथेला सुरूवात. दुसऱ्या चाहत्याने म्हटले की, तुमचा मोठा चाहता आहे. राणादा आणि अंजली बाई बेस्ट कपल. आणखी एका युजरने लिहिले की, मला विश्वासच बसत नाहीये वॉव...अभिनंदन.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र याबद्दल त्या दोघांनी कधी सांगितले नव्हते. मात्र आता या दोघांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची वार्ता दिली आहे.