‘लागिरं झालं जी’मध्ये साजरी होणार रमजान ईद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 10:01 IST2017-06-22T04:31:06+5:302017-06-22T10:01:06+5:30

आजवर मराठी मालिकांमध्ये दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा यांसारखे सण साजरे होताना आपण पाहिले आहेत. आता लागिरं झालं जी या ...

Ramzan Id to celebrate 'Lajar Jhal ji' | ‘लागिरं झालं जी’मध्ये साजरी होणार रमजान ईद

‘लागिरं झालं जी’मध्ये साजरी होणार रमजान ईद

वर मराठी मालिकांमध्ये दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा यांसारखे सण साजरे होताना आपण पाहिले आहेत. आता लागिरं झालं जी या मालिकेत प्रेक्षकांना रमजान ईदचा उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे. 
सातारा जिल्हा आणि भारतीय सैन्याचं असलेलं नातं, तेथील तरुणांची स्वप्नं आणि ती पूर्ण करण्यासाठीची त्यांची धडपड याची गोष्ट सांगणारी ‘लागिरं झालं जी’ ही मालिका नुकतीच सुरु झाली आहे. कमी वेळातच या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. विशेषतः मुख्य भूमिकेत असलेले अजिंक्य आणि शीतल हे कमालीचे लोकप्रिय झाले आहेत आणि राहुल, विकी, यास्मिन, हर्षवर्धन हे सहकलाकारही तेवढीच लोकप्रियता मिळवत आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी, तिकडे घडणाऱ्या गमती जमती, अज्या- शीतलीने खोड्या काढत एकमेकांवर कुरघोडी करणे या गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. याच मालिकेत आता प्रेक्षकांना ईद साजरी होताना बघायला मिळणार आहे. 
शीतलची मैत्रीण यास्मिनच्या घरी सर्व जण रमजान ईदनिमित्ताने एकत्र येणार असून ईद मुबारक म्हणत शिरखुर्माचा आस्वादही घेणार आहेत. सध्या सर्वत्र रमजानचा माहौल आहे. मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा सण सर्वात पवित्र असा सण असतो. रोजाच्या माध्यमातून करण्यात येणारी खुदाची इबादत आणि रमजानचा चाँद बघण्याची उत्सुकता या काळात बघायला मिळते. असेच काहीसे वातावरण लागिर झालं जी या मालिकेतसुद्धा बघायला मिळणार आहे. शीतलीची मैत्रीण यास्मिन आणि तिच्या कुटुंबियांसोबत सर्व जण ईद साजरी करणार आहेत. तिथे नेमके काय घडतेय आणि ईदचा आनंद हे सर्वजण कसे लुटतात हे पुढच्या काही भागांमध्ये कळेलच.

Must Read : 'लागिरं झालं जी'ची 'शीतल' इंस्टाग्रामवर दाखल

Web Title: Ramzan Id to celebrate 'Lajar Jhal ji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.