'रामायण'मधल्या अभिनेत्रीची झाली होती निर्घुण हत्या, २८ वर्षांनंतरही उलगडलं नाही रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:56 IST2025-07-15T15:49:05+5:302025-07-15T15:56:11+5:30

Urmila Bhatt: रामायणात माता सीतेच्या आईची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला भटच्या मृत्यूचे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही.

'Ramayana fame actress Urmila Bhatt was brutally murdered, the mystery has not been solved even after 28 years | 'रामायण'मधल्या अभिनेत्रीची झाली होती निर्घुण हत्या, २८ वर्षांनंतरही उलगडलं नाही रहस्य

'रामायण'मधल्या अभिनेत्रीची झाली होती निर्घुण हत्या, २८ वर्षांनंतरही उलगडलं नाही रहस्य

गेल्या महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक झालेल्या मृत्यूने चित्रपटसृष्टीला धक्का दिला. 'कांटा लगा गर्ल'च्या मृत्यूच्या कारणाबाबत विविध बातम्या समोर आल्या. जरीवालाच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. बॉलिवूडमध्ये एखाद्या सेलिब्रिटीचा मृत्यू गूढ राहण्याची ही पहिलीच घटना नाही. रामायणात माता सीतेच्या आईची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला भट(Urmila Bhatt)च्या मृत्यूचे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही. 

उर्मिला भट तिच्या कुटुंबासह जुहू येथील एका बंगल्यात आनंदी जीवन जगत होती. तिच्या कुटुंबात तिचा पती, मुलगा-सून आणि नातवंडे होती. तिच्या एका मुलीचे, रचनाचे लग्न मुंबईतच झाले होते. २१ फेब्रुवारी १९९७ रोजी तिचा मुलगा त्याच्या मुलांसह फिरायला गेला होता. आता उर्मिला आणि तिचा नवरा घरी एकटेच होते. उर्मिलाचा नवरा काही कामासाठी बडोद्याला गेला होता. अभिनेत्री उर्मिला घरी एकट्याच होत्या. 

उर्मिला भट यांची केलेली निघृण हत्या

२२ फेब्रुवारी रोजी सकाळी लवकर मोलकरीण घरी पोहोचली तेव्हा दार ठोठावल्यानंतरही दरवाजा उघडला नाही. तिने थोडा वेळ वाट पाहिली पण आत काहीच हालचाल झाली नाही. मुलगी रचनाने तिचा नवरा विक्रम पारेखला तिच्या आईची बातमी घेण्यासाठी पाठवले. विक्रम संध्याकाळी ७:३० च्या सुमारास जुहू येथील बंगल्यावर पोहोचला. तो दार ठोठावत राहिला पण कोणीही दार उघडले नाही. आवाज ऐकून शेजारी जमले. विक्रमने रचनाला फोन करून सर्व प्रकार सांगितला. रचनाही घरी पोहोचली. त्यांनी दार तोडले आणि आत गेले. त्यांनी घरात पाहिले तेव्हा समोरचे दृश्य भयानक होते. जमिनीवर रक्त पसरले होते. उर्मिला भट यांचा मृतदेह जमिनीवर पडला होता. तिला दोरीने बांधले होते. तोंडात कपडा कोंबला होता. तिचा गळा चिरलेला होता. ती मृतावस्थेत होती.

वर्कफ्रंट

१९६७ साली हमराज सिनेमातून उर्मिला भट यांनी कलाविश्वात एन्ट्री केली. त्यानंतर दो अंजाने आणि तिसरी मंझिल, आंखियों के झरोके से, बदलते रिश्ते, राम तेरी गंगा मैली, हीरो, घर हो तो ऐसा, इज्जत की रोटी, बहुरानी आणि अभिमन्यू यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. 

Web Title: 'Ramayana fame actress Urmila Bhatt was brutally murdered, the mystery has not been solved even after 28 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.