'राम तेरी गंगा मैली'मध्ये बोल्ड सीन देणारी मंदाकिनी तब्बल २७ वर्षानंतर करतेय कमबॅक, चाहत्यांना दिली खुशखबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 19:12 IST2023-05-12T19:08:27+5:302023-05-12T19:12:30+5:30
'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मंदाकिनी आजही चर्चेत असते.

'राम तेरी गंगा मैली'मध्ये बोल्ड सीन देणारी मंदाकिनी तब्बल २७ वर्षानंतर करतेय कमबॅक, चाहत्यांना दिली खुशखबर
राज कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यातील एक म्हणजे 'राम तेरी गंगा मैली'. या चित्रपटात अभिनेत्री मंदाकिनीने अतिशय बोल्ड भूमिका साकारली होती. त्यामुळे तिला खूप प्रसिद्धीही मिळाली. 'राम तेरी गंगा मैली'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मंदाकिनी 27 वर्षांनंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.
खुद्द मंदाकिनीने याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मंदाकिनी लवकरच कपिल शर्माच्या टीव्हीवरील शोमध्ये दिसणार आहे. या शोसाठी तीही खूप उत्सुक आहे.
'द कपिल शर्मा शो' मध्ये दर आठवड्याला, कपिल शर्मा टीव्ही, चित्रपट आणि स्पोर्ट्स सेलिब्रेटींना एकत्र आणतो आणि अनेक स्टार्ससोबत हसतो. गेल्या आठवड्यात रवीना टंडन, गुनीत मोंगा दिसल्या होत्या. आता आगामी भागात 'राम तेरी गंगा मैली' ची सुंदर अभिनेत्री मंदाकिनी दिसणार आहे.
अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती शोसाठी तयार होताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले- 'GRWM म्हणजे 'द कपिल शर्मा शो'मध्ये येण्यासाठी माझ्यासोबत तयार राहा.