"हा प्रवास आमच्या पूर्ण कुटुंबासाठीही...", राम कपूरच्या 'वेटलॉस जर्नी'वर काय म्हणाली पत्नी गौतमी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:28 IST2025-05-07T16:27:32+5:302025-05-07T16:28:17+5:30
माझ्या लेकीनेही ३८ किलो वजन कमी केलं... गौतमीचा खुलासा

"हा प्रवास आमच्या पूर्ण कुटुंबासाठीही...", राम कपूरच्या 'वेटलॉस जर्नी'वर काय म्हणाली पत्नी गौतमी?
'बडे अच्छे लगते है' फेम अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) सध्या त्याच्या वेटलॉस जर्नीमुळे चर्चेत आहे. त्याने ५५ किलो वजन कमी केलं आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच चकीत झाले आहेत. रामने सर्जरी केली का असेही प्रश्न त्याला विचारण्यात आले. आता नुकतंच राम कपूरची पत्नी गौतमी कपूरने (Gautami Kapoor) यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी कपूर म्हणाली, " या वर्षात आम्ही खरोखर अनेक वादात अडकलो. मी सांगू इच्छिते रामच्या वेटलॉसचा प्रवास फक्त त्याच्यासाठीच नाही तर आम्हा संपूर्ण कुटुंबासाठी खूप कठीण काळ होता. आम्ही बाहेर जाणं, इतरांना भेटणं पूर्णत: बंद केलं होतं. बाहेरुन खाणं ऑर्डर करणंही बंद केलं. जर राम खाणार नाही तर आम्ही कोणीच ते खाणार नाही. कारण आपण एक कुटुंब म्हणून ते एन्जॉय करत असतो. रामने वेड्यासारखं डाएटिंग केलं. कधी २४ तर कधी ४८ तास त्याने फास्टिंग केलं."
ती पुढे म्हणाली, "आमची लेक सियानेही सुमारे ३८ किलो वजन कमी केलं आहे. रामच्या आधी तिने वेटलॉसचा प्रवास सुरु केला होता. दोघंही भूक विसरुन जिमला जायचे. अक्षरश: भुकेले राहायचे. रामने ५० तर माझ्या मुलाने १० किलो वजन कमी केलं. असं करत एक एक जण वजन कमी करत आहे. आता पुढे माझं लक्ष्य हाऊस स्टाफवर आहे. त्यामुळे आता ते सगळे माझ्यासमोर यायला घाबरत आहेत."
गौतमी कपूर आणि राम कपूर यांनी २००३ साली लग्नगाठ बांधली. 'घर एक मंदिर' च्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. त्यांना सिया आणि अक्स ही मुलं आहेत.