राम कपूर-साक्षी तन्वर ही जोडी पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 11:01 IST2017-08-29T05:31:04+5:302017-08-29T11:01:04+5:30
छोट्या पडद्यावर विविध मालिकांमधून नवनवीन जोड्या समोर येतात. मात्र त्यापैकी काही जोड्या रसिकांच्या कायम लक्षात राहतात. त्यापैकीच साक्षी तन्वर ...
.jpg)
राम कपूर-साक्षी तन्वर ही जोडी पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार
छ ट्या पडद्यावर विविध मालिकांमधून नवनवीन जोड्या समोर येतात. मात्र त्यापैकी काही जोड्या रसिकांच्या कायम लक्षात राहतात. त्यापैकीच साक्षी तन्वर आणि राम कपूर या ऑनस्क्रीन कपलनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून या जोडीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या दोघांची अदाकारी आणि केमिस्ट्री यामुळे हे जोडी छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरली. या मालिकेनंतर ही जोडी करले तू भी मोहब्बत या एकता कपूरच्या वेबसिरीजच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आले. मात्र छोट्या पडद्यावर ही जोडी पुन्हा कमबॅक करणार का याची रसिकांना प्रतीक्षा होती. मात्र आता साक्षी आणि राम कपूर यांच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. साक्षी तन्वर लवकरच 'त्योहार की थाली' हा शो होस्ट करताना पाहायला मिळेल.या शोमध्ये राम कपूर गेस्ट होस्ट म्हणून हजेरी लावणार आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर साक्षी आणि राम कपूर ही जोडी रसिकांना या शोच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अभिनय कौशल्यापाठोपाठ साक्षीचं आता जेवण बनण्याचं कौशल्य या शोच्या माध्यमातून समोर येणार आहे. 'करले तू भी मोहब्बत' या वेबसिरीजमध्ये राम एका अभिनेत्याच्या भूमिकेत झळकले होते. करियरला उतरती कळा लागल्याने दारुच्या आहारी गेलेल्या अभिनेत्याची भूमिका राम कपूर यांनी साकारली होती. दुसरीकडे राम कपूर यांची थेरेपिस्टची भूमिका साक्षी तन्वरने साकारली होती. या वेबसिरीजला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर ही जोडी आणखी एका नव्या वेबसिरीजमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र सध्या तरी छोट्या पडद्याची ही हिट जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. त्यामुळे त्यांच्या रसिकांमध्येही नक्कीच उत्सुकता असेल नाही का ?