राम कपूरचा छोट्या पडद्यावर परतण्याचा नाही विचार, म्हणाला- "एकच भूमिका करत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 15:57 IST2024-09-13T15:57:08+5:302024-09-13T15:57:50+5:30
Ram Kapoor : अभिनेता राम कपूर 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेतून घराघरात पोहचला. या मालिकेत तो साक्षी तन्वरसोबत झळकला होता. या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.

राम कपूरचा छोट्या पडद्यावर परतण्याचा नाही विचार, म्हणाला- "एकच भूमिका करत..."
अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. बडे अच्छे लगते हैं या मालिकेतून तो घराघरात पोहचला. या मालिकेत तो साक्षी तन्वरसोबत झळकला होता. या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मात्र आता हा अभिनेता टीव्ही इंडस्ट्रीपासून दुरावला आहे. तो चित्रपट आणि ओटीटीवर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या ती युध्राच्या तयारीत व्यग्र आहे. टेलिव्हिजनवर परतण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले.
अलिकडेच राम कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत मालिकेत सध्या काम करण्याचा विचार नसल्याचे सांगितले आहे. त्याने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की, टीव्हीवर परतण्याचा काय विचार आहे? त्यावर राम म्हणाला की, सध्या मी टीव्हीवर परतत नाहीये. कारण जेव्हा तुम्ही इतके भाग्यवान असता की तुम्हाला यशस्वी शो करण्याची संधी मिळते, जसे मला मिळाले. तेव्हा प्रत्येक शो किमान ३-४ वर्षे चालतो. जर तुम्हाला टीव्हीमध्ये चांगले काम करायचे असेल तर तुमचा यशस्वी शो झाला पाहिजे, मग तुम्ही ३-४ वर्षे तीच भूमिका करत राहा.
अभिनेत्याला करायच्यात अशा भूमिका
राम कपूर म्हणाला की, आता मला ओटीटी आणि चित्रपटांमध्येही एक चांगला आणि सशक्त अभिनेता म्हणून स्वीकारले गेले आहे. त्यामुळे आता मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळत आहेत. मी अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट करत आहे. त्यामुळेच आता मी वर्षानुवर्षे एकच भूमिका करण्याचा विचार करू शकत नाही. मी त्या जागेचा आनंद घेत आहे जिथे प्रत्येक प्रकल्प एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. त्यामुळेच आता टीव्हीवर परतण्याचा कोणताही विचार नाही.
वर्कफ्रंट
राम कपूर शेवटचा २०१६ मध्ये तमन्ना या शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये तो अविनाश अरोराच्या भूमिकेत होता. यानंतर त्याने जिंदगी की क्रॉसरोड्स होस्ट केला होता. तेव्हापासून राम ओटीटी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटांमध्ये सक्रीय आहे.