Rakshabandhan Special : : 'आई कुठे काय करते'च्या सेटवर अभिनेत्री रुपाली भोसलेला मिळाला नवा भाऊ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 10:20 IST2021-08-22T10:19:46+5:302021-08-22T10:20:13+5:30
काही नाती ही रक्ताच्या नात्याच्या पलिकडची असतात असे म्हटले जाते.

Rakshabandhan Special : : 'आई कुठे काय करते'च्या सेटवर अभिनेत्री रुपाली भोसलेला मिळाला नवा भाऊ
काही नाती ही रक्ताच्या नात्याच्या पलिकडची असतात असे म्हटले जाते. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमधील संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले हिने रक्षाबंधनाच्या निमित्ताने सेटवरील भावाविषयी सांगितले. जाणून घेऊयात रुपाली भोसलेच्या नव्या भावाबद्दल.
रुपाली भोसलेने सांगितले की, आई कुठे काय करते मालिकेच्या टीममध्ये सामील होऊन मला एक वर्ष झाले आहे. बरोबच एक वर्षापूर्वी माझी आणि आमचे प्रोडक्शन सांभाळणाऱ्या संकेत बरेशी माझी भेट झाली. सेटवरचा पहिला दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे. मेकअपरुममध्ये माझी भेट घेण्यासाठी संकेत आला आणि त्याने मला तायडे अशी हाक मारली. त्या दिवसापासून तो मला तायडे अशीच हाक मारतो. माझ्या भावाचे नावही संकेत आहे आणि सेटवरही या संकेतने मला भावासारखाच जीव लावला आहे. दोघांच्या नावात जसे साम्य आहे अगदी तसेच साम्य त्यांच्या स्वभावातही आहे.
ती पुढे म्हणाली की, माझ्या खोड्या काढणे, थट्टा मस्करी करण्यासोबतच तो माझी खूप काळजीही घेतो. सिल्वासाला जेव्हा आमचे शूट सुरु होते तेव्हा तो रोज फोन करुन माझी आवर्जून चौकशी करायचा.
आई कुठे काय करते मालिकेमुळे मला जशी संजना ही नवी ओळख मिळाली त्याचप्रमाणे या मालिकेने मला एक भाऊही दिलाय. हे नाते मी आयुष्यभर जपेन.