आईच्या निधनाने राखी सावंतवर दु:खाचा डोंगर कोसळला, रुग्णालयातून पार्थिव नेताना अश्रूंचा बांध फुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 08:58 IST2023-01-29T08:57:02+5:302023-01-29T08:58:29+5:30
अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे काल रात्री निधन झाले. ब्रेन ट्युमरशी त्यांची झुंज अपयशी ठरली.

आईच्या निधनाने राखी सावंतवर दु:खाचा डोंगर कोसळला, रुग्णालयातून पार्थिव नेताना अश्रूंचा बांध फुटला
अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे काल रात्री निधन झाले. ब्रेन ट्युमरच्या आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल आईचे पार्थिव रुग्णालयातून नेताना राखीच्या अश्रूंचा बांध फुटला.
राखीची आई जया सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून ब्रेन ट्युमरशी लढा देत होती. काही दिवसांपासून आईला भेटतानाचे राखीचे व्हिडिओ समोर येत होते. त्यांची तब्येत खूपच खालावल्याचं त्यात स्पष्ट दिसत होतं. अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
अंबानींनी केली होती उपचारासाठी मदत
दरम्यान आईच्या उपचारासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी मदत करत आहेत असं राखीने काही दिवसांपूर्वीच माध्यमांसमोर सांगितले होते. तसेच राखीने बिग बॉस मराठी मध्ये सहभाग घेत टॉप ४ पर्यंत मजल मारली होती. फिनालेच्या दिवशी ती ९ लाख रुपये स्वीकारत स्पर्धेतून बाहेर पडली होती. आईच्या उपचारासाठी तिने हे पैसे स्वीकारले होते.
गेल्या काही दिवसांपासून राखीचे अनेक व्हिडिओ समोर येत होते. कधी ती एखाद्या एनजीओ मध्ये गेलेली दिसली तर कधी दर्ग्यात गेली. आई लवकर बरी होऊ देत यासाठी प्रार्थना करा असे ती सतत सांगायची. काल आईच्या निधनाने राखीवर दु:खाचा डोंगर कोसळला.