'खबरदार! मला हात लावाल तर...', राखी सावंत पापाराझींवर भडकली; नेमकं काय घडलं? पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 17:11 IST2022-01-29T17:10:41+5:302022-01-29T17:11:15+5:30
टेलिव्हिजनची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) रिअॅलिटी शो 'बिग बॉस- १५' मधून अखेर बाहेर झाली आहे. पण शो मधून बाहेर आल्यानंतरही राखी सावंत चर्चेचं केंद्रस्थान बनली आहे.

'खबरदार! मला हात लावाल तर...', राखी सावंत पापाराझींवर भडकली; नेमकं काय घडलं? पाहा Video
मुंबई
टेलिव्हिजनची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) रिअॅलिटी शो 'बिग बॉस- १५' मधून अखेर बाहेर झाली आहे. पण शो मधून बाहेर आल्यानंतरही राखी सावंत चर्चेचं केंद्रस्थान बनली आहे. शुक्रवारी रात्री ती बिग बॉस-१५ च्या सेटबाहेर दिसून आली. यावेळी राखी सावंत जे घडलं त्यावर ती चांगलीच भडकली आणि नेहमीप्रमाणे ड्रामा देखील केला. इतकंच नव्हे, तर पापाराझींना थेट धमकीच देऊन टाकली. मला कुणी हात लावला तर मी मानहानीचा दावाच ठोकेन असा धमकीवजा इशारा राखी सावंतनं पापाराझींना दिला. राखीचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
राखीसोबत नेमकं काय घडलं?
राखी सावंत निळ्या रंगाच्या एका हटके गाऊन आणि लूकमध्ये बिग बॉस-१५ च्या सेटबाहेर दिसून आली. राखीसोबत तिचा पती रितेश कुमार देखील उपस्थित होता. राखीला पाहातच पापाराझींचा घोळका तिचे फोटो टिपण्यासाठी जमा झाला. इतक्यात एकाचा पाय राखीच्या गाऊनवर पडला आणि राखी संतापली. "खबरदार मला हात लावाल तर. मला कुणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याच्यावर २०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन", अशी धमकीच राखीनं दिली. अर्थात राखीनं हे विधान गांभीर्यानं केलेलं नसल्याचं तिच्या बोलण्यातूनच उपस्थितांना कळून आलं होतं. म्हणूनच तिचं विधान ऐकून उपस्थित पापाराझी देखील हसू लागले.