Rakhi Sawant : राखी अन् तिचा ड्रामा, आधी आदिलला तुरुंगात भेटली नंतर केले नमाज पठण; video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 12:04 IST2023-02-20T12:03:00+5:302023-02-20T12:04:16+5:30

सध्या सोशल मीडियावर कोणाची ड्रामेबाजी सुरु असेल तर ती आहे ड्रामा क्वीन राखी सावंतची.

rakhi sawant visits husband in jail wore hijab video viral | Rakhi Sawant : राखी अन् तिचा ड्रामा, आधी आदिलला तुरुंगात भेटली नंतर केले नमाज पठण; video व्हायरल

Rakhi Sawant : राखी अन् तिचा ड्रामा, आधी आदिलला तुरुंगात भेटली नंतर केले नमाज पठण; video व्हायरल

Rakhi Sawant : सध्या सोशल मीडियावर कोणाची ड्रामेबाजी सुरु असेल तर ती आहे ड्रामा क्वीन राखी सावंतची. पती आदिल खानवर केलेल्या आरोपांमुळे राखी सतत चर्चेत आहे. सध्या आदिल तुरुंगात असून त्याच्यावर खटला सुरु आहे. अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही. आदिल तुरुंगाबाहेर येऊ नये म्हणून राखी सुद्धा पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे.दरम्यान राखीने आदिल खानची तुरुंगात जाऊन भेट घेतली असून आदिल फारत वाईट पद्धतीने वागला असल्याचं आता ती सांगत आहे.

राखीने आदिलची तुरुंगात भेट घेतली असून दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे राखीने सांगितले  आहे. व्हिडिओत राखी म्हणते, 'आदिलला मी भेटले. तो माझ्याशी खूप जास्त वाईट पद्धतीने वागत आहे. ती मला तुरुंगात पाठवले मी तुला कधीच माफ करणार नाही असं तो म्हणाला. १.६० कोटी रुपयांचं काय केलं विचारलं तर म्हणाला मी पोलिसांना सांगू की तुला सांगू. तो खरंच खूप वाईट बोलतोय.'

यानंतर आता राखीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा हिजाब घातला आहे.ती नमाज पठण करणार असल्याचं व्हिडिओतून कळत आहे. व्हिडिओमागे एक भावूक कविताही ऐकू येत आहे.

या व्हिडिओवर मात्र राखीला चांगलेच ट्रोल केले जात आहे. नेलपेंट लावून नमाज पठण करायचे नसते अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. राखीने ६ फेब्रुवारी रोजीच आदिलविरोधात एफआयआर दाखल केली होती. फसवणूक आणि मारहाण केल्याप्रकरणी आदिलला पोलिसांनी अटक केली. राखी करत असलेले आरोप गंभीर आहेत हे बघता आदिल खानची सध्या चौकशी सुरु आहे. आदिलची आधीच एक गर्लफ्रेंडही आहे जिच्याशी तो लग्न करणार आहे. हे सर्व प्रकरण बघता आदिलला जामीन मिळू नये यासाठी राखी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे.

Web Title: rakhi sawant visits husband in jail wore hijab video viral