"अंकिताच्या सासूबाई कैकयी बनू नका", विकीच्या आईवर भडकली राखी सावंत, म्हणाली- तुमचा मुलगा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 15:07 IST2024-01-15T15:07:09+5:302024-01-15T15:07:58+5:30

"मुलाच्या आणि सुनेच्या भांडणात पडू नका", अंकिताच्या सासूला राखी सावंतचा सल्ला

rakhi sawant slams vicky jain mother support ankita lokhande video goes viral | "अंकिताच्या सासूबाई कैकयी बनू नका", विकीच्या आईवर भडकली राखी सावंत, म्हणाली- तुमचा मुलगा...

"अंकिताच्या सासूबाई कैकयी बनू नका", विकीच्या आईवर भडकली राखी सावंत, म्हणाली- तुमचा मुलगा...

मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे 'बिग बॉस १७' पेक्षा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 'बिग बॉस'च्या घरात अंकिता आणि विकीमध्ये पहिल्या दिवसापासूनच खटके उडत आहेत. त्यावरुन विकीच्या आईने अंकिताला खूप सुनावलं होतं. त्यामुळे विकीच्या आईला ट्रोलही करण्यात आलं होतं. अनेक सेलिब्रिटींनीही याबाबत पोस्ट करत अंकिताला पाठिंबा दिला होता. आता राखी सावंत अंकिताच्या सासूवर भडकली आहे. 

राखीने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने अंकिताच्या सासूला खडे बोल सुनावले आहेत. राखी म्हणते, "अंकिताच्या सासूला मी सांगू इच्छिते की 'सास भी कभी बहू थी'. त्या दोघांच्या भांडणात तुम्ही का पडत आहात? तुम्ही काय करत आहात? खा, प्या आणि शांत बसा. असं पण, अंकिता बिग बॉस जिंकणार आहे. ही राखी सावंतची भविष्यवाणी आहे. तेव्हा तर तुम्हाला खूप आनंद होईल. माझी सून जिंकली, असं म्हणाल."

"अंकिताच्या सासूबाई असं करू नका. मुलाच्या आणि सुनेच्या भांडणात पडू नका. आमच्या घरीही खूप भांडणं व्हायची. पण, माझी आई यात कधीच पडायची नाही. सूनेचा मान ठेव. तिचा मान ठेवलास तर तुझ्या मुलींनाही सासरी मान मिळेल. आम्ही सगळे अंकितावर खूप प्रेम करतो. अंकिता माझ्या बहिणीसारखी आहे. मी तुमच्या घरीही आले होते. तुम्ही मला देवीसारख्या वाटायचा. तुम्ही कैकयी बनू नका. घर सांभाळा ते तोडू नका," असंही पुढे राखी म्हणते. 

दरम्यान, अंकिता आणि विकीमधील सततचे वाद पाहून नेटकऱ्यांनीही त्यांना ट्रोल केलं होतं. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर गेल्यानंतर विकीबरोबर राहण्याचा विचार करावा लागेल, असंही अंकिता म्हणाली होती. 

Web Title: rakhi sawant slams vicky jain mother support ankita lokhande video goes viral