राखीच्या घरी हलणार पाळणा, पतीचा फोटो दाखवल्यानंतर आता म्हणते मी होणार आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 15:34 IST2019-09-30T15:29:22+5:302019-09-30T15:34:25+5:30
ड्रामा क्वीन राखी सावंत आपल्या फॅन्ससोबत तिच्या सिक्रेट मॅरेजबाबत रोज एक नवा खुलासा करत असते. नुकताच तिने फॅन्सना तिचा पती ओळखण्याचा टास्क दिला होता

राखीच्या घरी हलणार पाळणा, पतीचा फोटो दाखवल्यानंतर आता म्हणते मी होणार आई
ड्रामा क्वीन राखी सावंत आपल्या फॅन्ससोबत तिच्या सिक्रेट मॅरेजबाबत रोज एक नवा खुलासा करत असते. नुकताच तिने फॅन्सना तिचा पती ओळखण्याचा टास्क दिला होता. तर काही दिवसांपूर्वी राखीने ती पतीकडे इंग्लंडला पोहोचल्याचे सांगितले होते. आता पुन्हा राखीने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखीने स्वत: प्रेग्नेंट असल्याचा खुलासा केला आहे. हा एक फनी व्हिडीओ आहे. यात राखी तिच्या पतीला ती प्रेग्नेंट असल्याचे सांगतेय. यावर तो म्हणतोय हे कसं होऊ शकतं मी तर इंग्लंडला आहे.'' यावर राखी फनी एक्सप्रेशन्स देतेय.
राखी सांगते तिचा पती एनआरआय असून तो खूप स्मार्ट आणि हँडसम आहे.आम्ही लंडनमध्ये नवे घर खरेदी केले आहे. मी स्वयंपाकही शिकले आहे. चपाती आणि भाजीपासून सुरुवात केली,’ असे राखीने सांगितले होते.
राखीने 28 जुलैला एका पंचताराकित हॉटेलमध्ये मुंबईत गुपचुप लग्न केले. या सोहळ्याला केवळ 4-5 लोक हजर होते. लग्नाचा बोभाटा होऊ नये म्हणून, हॉटेलचा संपूर्ण हॉल बुक न करता हॉटेलच्या खोलीतच लग्नविधी पार पडला, असे राखीने सांगितले होते. त्यादिवसापासून राखीचं लग्न मिस्ट्री बनून राहिलं आहे.