Kiss कॉन्ट्रोवर्सीनंतर 'ड्रामा क्वीन' राखी सावंत आणि मिका सिंगचे पुन्हा जुळले सूर, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:40 IST2025-10-20T13:40:14+5:302025-10-20T13:40:42+5:30
जुने सगळे वाद विसरून राखी सावंत आणि मिका सिंग हे आता एकत्र दिसले आहेत.

Kiss कॉन्ट्रोवर्सीनंतर 'ड्रामा क्वीन' राखी सावंत आणि मिका सिंगचे पुन्हा जुळले सूर, व्हिडीओ व्हायरल
'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सतत तिच्या विनोदी, वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राखी गेल्या काही दिवसांपासून दुबईत राहत होती. नुकतंच ती भारतात परतली आहे. भारतात येताच पुन्हा एकदा तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अशातच जुने सगळे वाद विसरून राखी सावंत आणि मिका सिंग हे आता एकत्र दिसले आहेत. त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
राखी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये मिका सिंगसोबत दिसली. दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते रोमँटिक गाण्यावर नाचताना आणि एकमेकांना हसत मिठी मारताना दिसत आहेत. राखी सावंत आणि मिका सिंग यांनी २००६ मध्ये झालेल्या "किस कॉन्ट्रोव्हर्सी" नंतर एकमेकांशी फार काळ संवाद साधला नव्हता. पण आता, कटुता मागे ठेवून नवीन दोघांनी नात्याची सुरुवात केल्याचे दिसत आहे.
२००६ मध्ये मीका सिंहनं वाढदिवसाच्या पार्टीमध्ये राखी सावंतला जबरदस्ती किस केलं होतं. ज्यामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद झाले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो खूपच अडचणीत आला होता. एवढंच नाही तर राखीनं मीका सिंगच्या विरोधात गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला होता.
आदिल खानसोबत राखी झाली विभक्त
काही दिवसांपूर्वी राखी सावंत आणि तिचा एक्स पती आदिल खान दुर्रानीचा घटस्फोट चर्चेत आला होता. दोघांनी लग्नाच्या एक वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अभिनेत्रीने धक्कादायक आरोप केले होते. कोर्टाच्या कारावाईदरम्यान राखी दुबईत शिफ्ट झाली होती. नुकतेच राखी आणि आदिलने एकमेकांच्या सहमतीने कोर्टाच्या बाहेर सर्व मुद्दे सोडवले आहेत. कारण दोघांना आपापल्या जीवनात पुढे जायचे होते. बॉम्बे हायकोर्टाने केस रद्द केली आहे. यावर राखी म्हणाली की, कायदेशीर कारवाई संपवण्यासाठी तिची काहीच हरकत नाहीये.