"पापा, पापा..." म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला अमेरिकेला निघाली राखी सावंत, म्हणते- "भाऊ एलॉन मस्क मला घ्यायला येणारे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 11:05 IST2025-10-20T11:04:55+5:302025-10-20T11:05:34+5:30
राखीचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती बॅग घेऊन एअरपोर्टला जात असल्याचं दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांना भेटायला राखी अमेरिकेला निघाली आहे.

"पापा, पापा..." म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला अमेरिकेला निघाली राखी सावंत, म्हणते- "भाऊ एलॉन मस्क मला घ्यायला येणारे..."
मॉडेल आणि अभिनेत्री राखी सावंत कायमच चर्चेत असते. राखी तिच्या अजब विधानांनी चाहत्यांना नेहमीच आश्चर्यचकित करते. काही दिवसांपूर्वीच राखीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तिने डोनाल्ड ट्रम्प यांना तिचे वडील म्हटलं होतं. तर एलॉन मस्क माझा भाऊ आहे असं राखी म्हणाली होती. आता डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांना भेटायला राखी अमेरिकेला निघाली आहे.
राखीचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती बॅग घेऊन एअरपोर्टला जात असल्याचं दिसत आहे. पापाराझींनी विचारल्यावर राखी म्हणते, "मी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला जात आहे. माझी आता अमेरिकेची फ्लाइट आहे. एअरपोर्टवर डोनाल्ड ट्रम्प मला घ्यायला घेत आहेत. पापा डोनाल्ड ट्रम्प, पापा डोनाल्ड ट्रम्प... एलॉन मस्क मला एअरपोर्टवर घ्यायला येत आहेत. डोनाल्ड ट्रम्प माझे वडील असले तरी ते अमेरिकेचे पीएम आहेत. ते थोडी मला घ्यायला येणार. माझा भाऊ एलॉन मस्क मला घ्यायला येत आहे".
दरम्यान, राखी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये दिसली होती. अनेक आयटम साँगही तिने केले होते. बिग बॉसमध्येही राखी सहभागी झाली होती. राखी तिच्या करिअरपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. याआधीही आदिल दुर्रानीसोबत लग्न केल्याने आणि त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती.