Rakhi Sawant Video : राखी सावंतला अश्रू अनावर; म्हणाली, 'माझं हृदय तुटलं आहे, इतकं दु:ख कधीच...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 13:33 IST2023-01-22T13:32:06+5:302023-01-22T13:33:12+5:30

मी आईला भेटायला जाते, कपडे पण मी बहिणीचे घातले आहेत. कपडे पण रेंटचे आहेत, राखी सावंत झाली भावूक.

rakhi sawant is heartbroken says there is so much pain in my life video went viral | Rakhi Sawant Video : राखी सावंतला अश्रू अनावर; म्हणाली, 'माझं हृदय तुटलं आहे, इतकं दु:ख कधीच...'

Rakhi Sawant Video : राखी सावंतला अश्रू अनावर; म्हणाली, 'माझं हृदय तुटलं आहे, इतकं दु:ख कधीच...'

Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या पब्लिसिटीचा पुरेपूर फायदा घेत आहे. रोज तिचा नवीन नवीन ड्रामा समोर येत आहे. मराठी बिग बॉस, मग आईची तब्येत, बॉयफ्रेंड आदिल खानसोबत (Adil Khan) निकाह आणि शर्लिन चोप्राने केलेल्या आरोपांप्रकरणी पोलिस चौकशी या सर्व प्रकरणांमुळे सध्या ती चर्चेत आहे. मात्र आता नुकत्याच आलेल्या व्हिडिओत राखी खूपच भावूक झाली आहे. राखीची आई ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहे त्यामुळे राखी सध्या चिंतेत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या मराठी बिग बॉस सिझन ४ (Bigg Boss 4) मध्ये राखीने चॅलेंजर्स म्हणून घरात प्रवेश घेतला होता. तिने टॉप ४ मजल मारली. मात्र बिग बॉसने दिलेली ९ लाख रुपयांची ऑफर स्वीकारत ती स्पर्धेतून बाहेर पडली. अर्थात आईच्या उपचारासाठी तिने ही रक्कम स्वीकारली. राखीची आई क्रिटिकेअर रुग्णालयात (Criticare Hospital) दाखल असून ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) राखीला आर्थिक मदत करत असल्याचं अलीकडेच राखीने सांगितलं. फिल्मी मंत्रा मीडियाने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत राखी भावूक झालेली दिसत आहे. तिला अश्रू अनावर झाले आहेत.

राखी म्हणते, 'मी आईला भेटायला आली आहे. सध्या आयुष्यात खूपच चढ उतार येत आहेत. चढ कमी तर फक्त उतार आणि उतारच येत आहेत. मी जीवनात लढा देत आहे. मला सांगताही येत नाहीए की माझ्या आयुष्यात किती दु:ख आहेत. एकाच गोष्टीबाबत नाही तर प्रत्येक गोष्टीबाबत मी दु:खी आहे. माझं हृदय तुटलं आहे. इतकं दु:ख कधी कोणाच्याही वाट्याला येऊ नये. मी आईला भेटायला जाते, कपडे पण मी बहिणीचे घातले आहेत. कपडे पण रेंटचे आहेत.'

राखीच्या या नवीन व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस सुरु झाला आहे.' हिची आई आजारी असताना असा ड्रामा नाही केला पाहिजे' अशा प्रतिक्रिया येत आहेत. मीडियासमोर वेळ घालवण्यापेक्षा आईला वेळ दे असं युझर्स सांगत आहेत. 

Rakhi Sawant : पोलिस स्टेशनमधून बाहेर येताच राखीने जोडले हात, 'निवडणुकीला उभी आहे का?' युझर्सने केले ट्रोल

काही दिवसांपूर्वीच मॉडेल शर्लिन चोप्राने राखीवर प्रायव्हेट फोटो, व्हिडिओ व्हायरल केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणी राखीची अंबोली पोलिसांनी चौकशी केली आणि नंतर तिला सोडण्यात आले. सध्या राखी नवरा आदिलसोबत तिच्या आईला भेटण्यासाठी रुग्णालयात जात असते. दरम्यान बुरखा घातल्याने राखीला ट्रोलही करण्यात आले होते.

Web Title: rakhi sawant is heartbroken says there is so much pain in my life video went viral