Rakhi Sawant : आमचं लग्न खोटं, मौलानाही खोटा...? राखी सावंत संतापली, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 13:13 IST2023-02-15T13:12:42+5:302023-02-15T13:13:03+5:30
Rakhi Sawant : राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात राखी आदिलच्या कुटुंबाबद्दल संताप व्यक्त करताना दिसतेय.

Rakhi Sawant : आमचं लग्न खोटं, मौलानाही खोटा...? राखी सावंत संतापली, व्हिडीओ व्हायरल
छोट्या पडद्यावरची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. राखीचा पती आदिल खान दुर्रानी कोठडीत आहे आणि बाहेर राखी मीडियासमोर त्याच्या कुरापतींबद्दल मीडियाला ओरडून ओरडून सांगतेय. राखीने पती आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखीने आदिलविरुद्ध मारहाणीची तक्रार केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलला ७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता राखीने आदिलच्या कुटुंबीयांवरही संताप व्यक्त केला आहे.
राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात राखी आदिलच्या कुटुंबाबद्दल संताप व्यक्त करताना दिसतेय.
राखी म्हणाली..
“आदिल मला सपोर्ट करत नाहीये. पण त्याच्या कुटुंबीयांनी तरी मला सपोर्ट करायला हवा. आता मी न्याय मागायला कोणाकडे जाऊ? कुठे जाऊ? आदिलच्या कुटुंबीयांना सगळं माहीत होतं. आमच्या रजिस्टर लग्नाबद्दल मी आठ महिन्यांआधीच त्यांना सांगितलं होतं. सगळी कागदपत्रंही त्यांना सोपवली होती. त्याच्या काकूला, त्याच्या आईला सगळ्यांना याबद्दल माहीत होतं. तरीही त्यांनी आदिलचा साखरपुडा केला. मी आदिलच्या वडिलांना फोन करते, ते कट करतात. त्याची आई, त्याच्या काकूशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनीही माझा फोन कट केला. मी बॉलिवूड सेलिब्रिटी आहे मग आम्ही बॉलिवूडवाले खोटं बोलतो का? म्हैसूरमधील एका मुलीने आदिलविरोधात बलात्काराची तक्रार केली आहे. तिच्यावर अन्याय झाला आहे. ती मुलगी तर सर्वांसमोर यायलाही तयार नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहेत.
आदिलची गर्लफ्रेंड म्हणते की “राखी माझी बायको नाही” असं आदिल म्हणतो. आमच्या लग्नाची सगळी कागदपत्रं खोटी आहेत, आमचं लग्न खोटं आहे, मौलानाही खोटा आहे, असं ती म्हणते. आज नाहीतर उद्या आदिलला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट नक्की मिळणार. मी त्याची बायको त्याला व्हॅलेन्टाईनचं सरप्राईज नक्कीच देणार. मला न्याय मिळो आणि आदिलला जामीन न मिळो अशी तुम्ही प्रार्थना करा,” असं राखी या व्हिडीओत म्हणतेय.