राकेश बापट म्हणतोय चित्रपट करायची ही योग्य वेळा नाही.. का म्हणतोय राकेश असे वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 15:21 IST2016-11-18T15:19:40+5:302016-11-18T15:21:19+5:30

 बेनझीर जमादार       मराठमोळा अभिनेता राकेश बापट याने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ...

Rakesh Bapat wants to do a film. This is not the right time. Why do you say Rakesh? | राकेश बापट म्हणतोय चित्रपट करायची ही योग्य वेळा नाही.. का म्हणतोय राकेश असे वाचा..

राकेश बापट म्हणतोय चित्रपट करायची ही योग्य वेळा नाही.. का म्हणतोय राकेश असे वाचा..

 बेनझीर जमादार

     
मराठमोळा अभिनेता राकेश बापट याने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याचा तुम बिन हा चित्रपट आज ही प्रेक्षक विसरले नाहीत. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकाराने मालिकांमध्येदेखील काम केले आहे. बहु  हमारी  रजनीकांत या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या या मालिकेविषयी त्याने लोकमत सीएनएक्सशी साधलेला मनमोकळा संवाद 

1. एखाद्या कलाकाराची रिप्लेसमेंट करणे किती कठीण असते ?
- सगळया भूमिकेपेक्षा कॉमेडी भूमिका साकारणे खरचं एक कठीण गोष्ट असते. कारण लव्ह, रोमान्स, इमोशनल भूमिका साकारणे हे सोपे असते, पण कॉमेडी करणे तेवढे शक्य नसते. खरं सांगू का, कॉमेडी हे टाइमिंगनुसार जमून आले पाहिजे. कॉमेडी हा एक टाइमिंगचा खेळ आहे. त्यामुळे जे स्क्रीप्टमध्ये नसेल तरी आम्ही सर्व कलाकारा टाइमिंगनुसार कॉमेडी घडवून आणतो. तसेच मालिकेत कोणताही चेहरा आला तरी फरक पडत नाही. फक्त स्टोरी चांगली असायला पाहिजे असे माझे मत आहे.

2. मराठी मालिका आणि चित्रपटमध्ये काय फरक जाणवितो?
- आजकाल मालिका आणि चित्रपटांमध्ये पूर्वीसारखा फरक राहिलेला नाही. पूर्वी एक ते दोन सीन दिवसांतून शूट व्हायचे. आता मात्र सगळ्यांचे बजेट कंट्रोल आहे. त्यामुळे मराठी चित्रपट पण आजकाल मालिकांसारखे शूट होतात. त्याचप्रमाणे मालिकांचे नियोजनदेखील अधिक चांगले केलेले असते. तसा फरक म्हणावा तर,  टीव्ही हा फक्त आकाराने लहान आहे. त्याचप्रमाणे चित्रपटांच्या तुलनेत मालिकांच्या प्रोसेसमध्ये ही काही फरक जाणविला नाही. 

3. एक कलाकार म्हणून तुला टीव्ही हे माध्यम घराघरात पोहोचण्यासाठी सोईस्कर वाटते का?
- हो, खरचं छोटया पडदयावरून घराघरात पोहोचणे हे अधिक सोईस्कर असते. कारण घरोघरी टीव्ही हे माध्यम असल्यामुळे प्रेक्षक काहीही घडले तरी घरी आरामात बसून टीव्हीवर पाहू शकतात. तसेच प्रत्येकजण स्वत:च्या वेळेनुसार ही टीव्ही पाहू शकतो. तसचे मी यापूर्वी चित्रपटातदेखील काम केले आहे. त्यानंतर मालिका ही केल्या आहेत. पण मला असे कधी वाटलं नाही की फक्त मोठया पडदयावरच काम करावे. कारण माझ्यासाठी काम महत्वाचे आहे. 

4. तुझे काही आगामी प्रोजेक्ट आहेत का?
- आता सध्या फक्त बोलणी सुरु आहे. पण मी स्वत: काही ऑफर स्वीकारत नाहीय. कारण डेलीसोपसाठी महिन्यांचे संपूर्ण तीस दिवस सेटवरच काढावे लागते. तसेच सगळे एपिसोड चॅनेलला दयावे लागते. त्यामुळे आता काही चित्रपट स्वीकारण्याची ही योग्य वेळ नसल्याचे मला वाटते. पण या मालिकेनंतर नक्कीच मी चित्रपट करेन. 

5. असे ऐकले आहे की, तू  सामाजिक संस्था सुरू केली आहे?
-  हो,  माझ्या बहिणीला लहान मुले खूप आवडतात. तिच्या प्रेमापोटी मी आणि माझी बहीण शितल बापट हिने सामाजिक संस्था सुरू केली आहे. या संस्थेचे नाव श्यामची आई असे आहे. खरं तर आजच्या मुलांमध्ये खूप कलागुण आहेत. पण आर्थिक परिस्थीती अभावी त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही. अशा मुलांच्या विकासासाठी आमची संस्था काम करत आहे.

Web Title: Rakesh Bapat wants to do a film. This is not the right time. Why do you say Rakesh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.