"चमत्कार हो गया..." १५ दिवसांनी राजू श्रीवास्तव शुद्धीवर येताच मित्र सुनील पालची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 16:09 IST2022-08-25T15:51:10+5:302022-08-25T16:09:20+5:30

Raju Srivastav : गेले १५ दिवस राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट सुनील पाल चाहत्यांना देत होता. आज राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आल्यावर सुनील पालच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे.

Raju Srivastav health update Sunil Pal share happy video for comedian | "चमत्कार हो गया..." १५ दिवसांनी राजू श्रीवास्तव शुद्धीवर येताच मित्र सुनील पालची पहिली प्रतिक्रिया

"चमत्कार हो गया..." १५ दिवसांनी राजू श्रीवास्तव शुद्धीवर येताच मित्र सुनील पालची पहिली प्रतिक्रिया

Raju Srivastav Health Update अखेर १५ दिवसांनंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील AIMS मध्ये उपचार सुरू होते. डॉक्टर, कुटुंबीय, मित्र आणि चाहते, सर्वजण राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. डॉक्टरांची टीम दिवसरात्र त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. तर दुसरीकडे चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे. राजू श्रीवास्तव शुद्धीवर येताच त्यांचा जिवलग मित्र सुनील पाल खूप आनंदी दिसतो आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव सकाळी 8.10 वाजता शुद्धीवर आले, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती तपासली. राजू श्रीवास्तव शुद्धी येताच त्यांचा मित्र सुनील पालचा आनंद गगनात मावत नाहीय. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. 

व्हिडिओमध्ये सुनील पाल म्हणतोय, गुड न्यूज राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले आहेत. मी म्हणायचो की चमत्कार घडेल. सर्व कुटुंब, मित्र आणि प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाला प्रेम, धन्यवाद. तो पुढे म्हणतो की, राजू भाई तुम्ही हजारो वर्षे जगा, हीच प्रार्थना. सुनील पाल  राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीचे अपडेट चाहत्यांना सतत्याने देत होता. 

राजू श्रीवास्तव यांनी ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. दूरदर्शनवरील शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून त्यांना खरी ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी आपला यूपीचा अंदाज दाखवला आणि आपल्या पंच लाइनने लोकांना हसवलं.
 

Web Title: Raju Srivastav health update Sunil Pal share happy video for comedian