'या' मालिकेत दिसणार राजकुमार राव आणि श्रध्दा कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 06:30 IST2018-08-29T13:28:04+5:302018-08-30T06:30:00+5:30

कलर्सची मालिका कौन है? च्या कथेने प्रेक्षकांना खेळवून ठेवले आहे. आगामी एपिसोडमध्ये 'स्त्री' सिनेमाचे प्रमोशनसाठी श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव येणार आहेत तसेच मधुरा नाईकसुद्धा दिसणार आहे. 

Rajkumar Rao and Shradhath Kapoor will appear in this series | 'या' मालिकेत दिसणार राजकुमार राव आणि श्रध्दा कपूर

'या' मालिकेत दिसणार राजकुमार राव आणि श्रध्दा कपूर

ठळक मुद्दे 'कौन है?' मध्ये येणार श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव

कलर्सची मालिका कौन है? च्या कथेने प्रेक्षकांना खेळवून ठेवले आहे. आगामी एपिसोडमध्ये 'स्त्री' सिनेमाचे प्रमोशनसाठी श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव येणार आहेत तसेच मधुरा नाईकसुद्धा दिसणार आहे. 

के के स्टुडिओ भोवती ही कथा फिरते आहे. जो दुष्ट शक्तींनी अनेक वर्षांपूर्वी झपाटलेला आहे. प्रत्येक अमावास्येच्या रात्री कलाकार आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाते कारण त्यांच्यावर दुष्ट शक्तींनी हल्ला करू नये म्हणून. पण एका सिनेनिर्मात्याच्या टीमने ही प्रथा मोडण्याचे ठरविले आणि त्यांच्या नवीन सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. या विषयी माहिती नसलेली लोकप्रिय अभिनेत्री नंदिनीने हा भयपट असलेला सिनेमा स्विकारला आणि अमावास्येच्या रात्री चित्रीकरणाला प्रारंभ केला. पण तिच्या दुर्दैवाने ती त्या झपाटलेल्या स्टुडिओत जमिनीखाली अडकून बसते आणि त्या दुष्ट आत्म्याची शिकार होते. कौन है? मालिकेविषयी बोलताना अभिनेता राजकुमार राव म्हणाला, “भयपट हा अतिशय मनोरंजक प्रकार आहे आणि आपल्या सिनेमांमध्ये काही कारणांमुळे तो जास्त दाखविला गेलेला नाही. माझा दुसरा सिनेमा एक भयपटच होता. भयपटाचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग आहे आणि मग तो जर भयपट कॉमेडी असेल, जसा स्त्री आहे तर प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद देतात. माझा भुतांच्या भौतिक अस्तित्वावर विश्वास नाही पण माझा शक्तीवर विश्वास आहे. या जगात त्या नकारात्मक व सकारात्मक दोन्ही प्रकारच्या सामावलेल्या आहेत. त्यामुळेच जेव्हा आपण एखाद्या झपाटलेल्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला नकारात्मक कंपने जाणवतात.” 

'स्त्री' सिनेमात श्रद्धा कपूर भूताच्या भूमिकेत दिसले तर राजकुमार राव पीडित ट्रेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच राजकुमार श्रद्धासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

Web Title: Rajkumar Rao and Shradhath Kapoor will appear in this series